Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या नेत्याच्या मुलानेही भरपावसात आझाद मैदान गाठले!

Bhagirath Bhalke reaches Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे पाटील हे आरपारची लढाई लढत आहेत. त्या लढाईला समर्थन देण्यासाठी (स्व) भारतनाना भालकेंचे चिरंजीवही आझाद मैदानात पोचले होते.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 29 August : मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपूरचे आमदार (स्व) भारत भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा राज्यात सर्वप्रथम दिला होता. भारत भालके यांचे दुर्दैवाने कोरोना काळात निधन झाले. मात्र मराठा आरक्षणासह धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे पाटील हे आरपारची लढाई लढत आहेत. त्या लढाईला समर्थन देण्यासाठी (स्व) भारतनाना भालकेंचे चिरंजीवही आझाद मैदानात पोचले होते. विधानसभेच्या निवडणुकीपासून राजकीय आणि सावर्जनिक कार्यक्रमापासून काहीसे अंतर राखून वागणारे भगीरथ भालके यांनी आज भरपावसात आझाद मैदानात हजेरी लावून जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणााठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निकाराची लढाई सुरू केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या सर्व विभागातील लोक मिळेल त्या वाहनांतून मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे आरपारची लढाई लढत आहेत.

मंगळवेढ्यात मराठा आरक्षणाच्या लढाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवली होती. ती लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रकर्षाने दिसून आली होती. तत्पूर्वी मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमदार (स्व.) भारत भालके (Bharath Bhalke) यांनी आमदारकीचा राजीनामा राज्यात सर्वप्रथम दिला होता. तसेच समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला होता.

आमदार असताना भारत भालके यांनी कायम आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा संघटनांनी त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला महापुजेला पंढरपूरला येण्यापासून रोखले होते. तसेच, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्या केलेल्या गायकवाड कुटुंबीयांची भेट घेणारे भारत भालके हे पहिले आमदार होते.

Bhagirath Bhalke
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचा मोठा आरोप; ‘जरांगेंच्या चेहऱ्याआडून फडणवीसांचे सरकार उलथवण्याचा प्रयत्न; त्यात अजितदादांचे आमदारही...’

भारत भालके यांचे कोरोना काळात निधन झाले. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनीही मराठा आरक्षणाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तसेच, आज मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भगीरथ भालके हे भरपावसात आझाद मैदानात पोचले होते.

Bhagirath Bhalke
Manoj Jarange Hunger Strike : आमदार मामा भाच्यांचा मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; मुंबईत आझाद मैदानात जाऊन केली चर्चा!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांनीही मुंबईतील आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविला. याशिवाय मंगळवेढा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल घुले, संभाजी बिग्रेडचे संदीप फडतरे, होलार समाजाचे नाथा ऐवळे, सीताराम भगरे यांनी सहभाग नोंदवला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला दुखावणे अडचणीचे ठरू शकते, हे ओळखून अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com