
Mumbai, 29 August : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आझाद मैदानावरील उपोषणाला हजेरी लावली आहे. एकीकडे मुंबईत जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठा आरोप केला आहे.
लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, मराठा बांधवांच्या शिक्षण आणि नोकरीची माध्यमांच्या द्वारे जी कळवळ दाखवली जाते. पण, हे तसं नाही. मनोज जरांगे पाटील यांनी हा राजकीय अजेंडा असल्याची स्क्रीप्ट मुंबईकडे जातानाच फोडली. हा राजकीय अजेंडा कसा? तर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मी हे सरकार उलथवून लावणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की, त्यात फक्त विरोधी पक्ष सामील असेल. पण, मी तुम्हाला जबाबदारीने सांंगतो. फडणवीस यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी जसे विरोधी पक्षातील आमदार आणि खासदार सामील आहेत. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे आमदार आणि खासदारही सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगतो. यात मी माझ्या पदचं काहीही सांगत नाही, असा गौप्यस्फोटही हाके यांनी केला.
मला राजकीय विषयावर बोलायचंही नाही. पण, मनोज जरांगे पाटील नावाच्या चेहऱ्याआडून महाराष्ट्रातील काही आमदार अणि खासदार हे सरकार अस्वस्थ करायचे प्रयत्न करत आहेत. सरकार बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही हाके यांनी केला आहे.
आरक्षण हा विषयच नाही. माझ्या मराठा बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण संपेल. कारण, ओबीसी आरक्षण हे शासनकर्ते आणि राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळण्यासाठी आहे. ज्यांपासून संरक्षण पाहिजे, तेच सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचे काय होणार, याची जाणीव सर्व नेतेमंडळींना आहे का, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला.
लक्ष्मण हाके म्हणाले, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना लेटरहेडवर पाठिंबा असल्याचे लिहून दिले आहे. तुम्ही जरांगे पाटील यांना पाठिंबा देता. पण, ओबीसी आरक्षणाबाबतची तुमची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या लाेकप्रतिनिधींना केले आहे. तुम्हाला ओबीसींचे आरक्षण संपवायचे आहे का? तुमच्या स्पर्धेत इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.