Bhagirath Bhalke News : 'आता अंत्ययात्रा, तर मतपेटीतून दहावा करा!'; मराठा आरक्षणासाठी भगिरथ भालके आक्रमक

Mangalwedha Protest for Maratha Reservation : मंगळवेढ्यात पाच दिवस आरक्षणासाठी विविध आंदोलनातून सरकारचा निषेध
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama

Solapur Political News : जालन्यात सुरू झालेल्या मराठा आंदोलनामुळे राज्यातील समाजबांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. मंगळवेढा येथेही मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सरकारविरोधात घोषणाबाजी करत आक्रोश मोर्चा काढून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी 'बीआरएस' नेते भगिरथ भालके यांनी आजी-माजी सरकारवर निशाणा साधला. 'मराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. आरक्षण नाकारणाऱ्या सरकारची आता अंत्ययात्रा काढली तर मतपेटीतून दहावा करा,' असा घणाघात भालकेंनी केला आहे. (Latest Political News)

मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाबाबत पाच दिवस वेगवेगळे आंदोलन केले जात आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा श्री दामाजी चौक ते शिवजयंती मिरवणूक मार्गावरून काढण्यात आला. यावेळी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दामाजी चौकात त्याचे दहन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेतून भगिरथ भालकेंनी (Bhagirath Bhalke) सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर सडकून टीका केली.

Bhagirath Bhalke
Gokul Dudh Sangh : गोकुळच्या सभेत 'दुध का दुध-पानी का पानी !'; शौमिका महाडिकांचे दहा प्रश्न सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार

भालके म्हणाले, 'आरक्षणासाठी मराठा समाज एकजुटीने रस्त्यावर उतरू लागला आहे. राजकारण्यांनी राजकारण जरूर करावे, परंतु ५८ मोर्चे शांततेने काढूल्यानंतरही मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले जाते, हा काय प्रकार आहे. समाजाच्या भविष्यासाठी व पिढ्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आरक्षण दिले नाही, तर सरकारला जागा दाखवण्यासाठी यापेक्षा तीव्र आंदोलन करू. समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल,' असा इशाराही भालकेंनी दिला. (Maharashtra Political News)

खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी, 'आरक्षणासाठी मराठा समाजाला वारंवार रस्त्यावर उतरावे लागत असेल तर समाज सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा दिला आहे.

राजाभाऊ चेळेकर म्हणाले, 'मराठा आरक्षणासाठी इतर १८ पगड समाजातील बांधवांनीही पाठिंबा दिला. परंतु सरकारचे आरक्षण देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. भविष्यात मराठा समाजाबरोबर मुस्लिम, धनगर या समाजाने पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकजूट ठेवावी लागेल. राजकारण करण्यापेक्षा पाठीचा कणा ताठ ठेवून समाजकारण करावे,' असे आवाहन केले.

प्रा. येताळा भगत यांनी, 'आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवून मराठा बांधवाच्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. तर 'मराठा आरक्षणाचा निर्णय चालढकल करत आहे. भविष्यात मराठा बांधव राज्यकर्त्यांना मतदान करण्याबाबत विचार करतील, असे मत माऊली कौडूभैरी यांनी व्यक्त केले.

(Edited by Sunil Dhumal)

Bhagirath Bhalke
Sunil Shelke News : "...तर आमदारकीचा राजीनामा देणार!"; अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंचं खळबळजनक विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com