Gokul Dudh Sangh : गोकुळच्या सभेत 'दुध का दुध-पानी का पानी !'; शौमिका महाडिकांचे दहा प्रश्न सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार

Shoumika Mahadik, Satej Patil, Hasan Mushrif : महाडिकांचा गट सतेज पाटील, हसन मुश्रीफांच्या गटाला घेरण्याच्या तयारीत
Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर गोकुळ संचालिका शौमिका महाडिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या विविध प्रश्नांवरून वारंवार सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आसूड ओढत आहेत. गोकुळ दूध संघाचे लेखापरीक्षण असो वा दुधात झालेली घट, अशा अनेक विषयांवरून महाडिक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत आहेत. जिल्हात गोकुळच्या दुधात झालेली घट आणि अमूलचे वाढलेले प्रस्थ हे शेतकऱ्यांसह संघासाठी धोक्याची घंटा आहे. दरम्यान, अनेक प्रश्न उपस्थित करूनही सत्ताधारी आणि संघाचे कारभारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Latest Political News)

या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाची शुक्रवारी सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेसाठी शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) दहा प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्यांच्या समोरे जाणार आहेत. मागील वेळच्या सभेत महाडिक यांना एकही प्रश्न विचारू दिला नाही. तर त्यांच्या जवळील माईक बंद ठेवण्यात आला होता, असा आरोप ही झाला होता. आता उद्या होणाऱ्या सभेत सत्ताधारी शौमिका महाडिक यांच्या प्रश्नांना उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
Hasan Mushrif Vs Sanjay Mandlik : शिंदे गटाचे विनाकारण आकांडतांडव; अजित पवार गटाचा पलटवार

काय आहेत शौमिका महाडिक यांचे प्रश्न

  • संपर्क सभांमध्ये संघाच्या कारभारामध्ये बचत केल्याचे सांगितले. पण अशी बचत अहवालात दिसत नाही. प्रत्यक्षात सर्वच खर्चात वाढ दिसते, याचे कारण काय ?

  • वाशी मुंबई शाखेत बाहेरून खरेदी केलेल्या दुधामध्ये वाढ दिसते. मुंबईच्या म्हैस दूध विक्रीत घट दिसते. बाहेरील दूध पूर्वीप्रमाणे सहकारी संस्थांकडून न घेता खासगी संस्थांकडून घेतले जाते. याचे कारण काय? तीनही गोष्टींचा खुलासा करावा.

  • पशुखाद्य कारखान्यात सोलर पॅनल बसवून कोट्यवधींची बचत केल्याचे सांगण्यात आले. पण अहवालात पशुखाद्य विभागाचा नफा फक्त एक लाख दिसतो. मग बचत केलेली रक्कम कुठे गेली ?

  • सन 2022-23 मध्ये संचालक खर्चासाठी 30 लाख रुपयांची मंजुरी असताना 49 लाख रुपये खर्च केले गेले. सदर खर्चाचा तपशील द्यावा.

  • जिल्ह्यातील दूध संकलन घटलेले असताना संकलन खर्चात वाढ कशी? प्रामुख्याने कोणत्या रूटला संकलन वाढ त्याची माहिती मिळावी. (Maharashtra Political News)

  • कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांकडून संकलित होणाऱ्या म्हैस व गाय दुधाची मागील तीन वर्षांची आकडेवारी मिळावी. इतर जिल्ह्यातील व परराज्यातील आकडेवारी देऊ नये. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी द्यावी.

  • सन 2020-21 अखेर संघाच्या किती मुदतबंद ठेवी शिल्लक होत्या? आता 2023 अखेर किती शिल्लक आहेत ?

  • दूध संघाची वाढलेली उलाढाल ही केवळ दूध खरेदी-विक्री दरात वाफच केल्यामुळेच आहे का? आणि उलाढाल वाढूनही व्यापारी नफ्यात घट का ?

  • मागील झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आजपर्यंत संस्थांना किती लिटर वासाचे दूध परत केले गेले, त्याची आकडेवारी मिळावी.

  • - संपर्क सभांमध्ये वाहतूक खर्चात बचत केल्याची माहिती मिळाली, पण प्रत्यक्ष अहवालात वाहतूक खर्चात वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे 2020-21 मध्ये वाहतूक ठेकेदारांना अदा केलेल्या बिलांची रक्कम व 2022-23 मध्ये अदा केलेली एकूण रक्कम याची तुलनात्मक माहिती मिळावी. खर्चात वाढ कशामुळे झाली, याचा खुलासा करावा.

(Edited by Sunil Dhumal)

Satej Patil, Hasan Mushrif, Shoumika Mahadik
IAS Officer Transfer : 'सरकारनामा'चा दणका, 'आयएएस' अश्विनी जोशी यांची थेट बदलीच, 'ई- लायब्ररी'चे टेंडर भोवले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com