Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंनीही विधान सभेसाठी शड्डू ठोकलाच; जन आशीर्वाद यात्रेतून ताकद आजमावणार

Pandharpur-Mangalvedha Constituency : भगीरथ भालके हे पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी भगीरथ भालके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली आहे.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 September : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून इच्छुक असलेले भगीरथ भालके जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अखेर विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडे पंढरपूर-मंगळवेढ्यातून उमेदवारीसाठी स्पर्धा लागली असताना भगीरथ भालके हे येत्या 14 तारखेपासून मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. महाविकास आघाडीकडून इच्छूक असलेले भालके या यात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधणार आहेत.

भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी भगीरथ भालके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची दोन वेळा भेट घेतली आहे. महाविकास आघाडीकडून आपली निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून आपण पवारांची भेट घेतली, असे भालके यांनी भेटीनंतर स्पष्ट केले होते.

लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी काम केले होते. अपेक्षेप्रमाणे पंढरपूर मंगळेवढ्यातून (Pandharpur-Mangalvedha ) प्रणिती शिंदे यांना मताधिक्यही मिळाले होते.

महायुतीकडे पंढरपूरमधील झाडून सारे नेते असताना भालके यांनी शिंदे यांच्यासाठी एकाकी खिंड लढवली होती. त्यातून त्यांनी मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना लीड मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.

Bhagirath Bhalke
Sharad Pawar Politics : पंढरपूर विधानसभेसाठी इच्छूक तीन नेत्यांनी एकत्रित घेतली पवारांची भेट; मोहिते पाटील ॲक्शन मोडवर

दरम्यान, येत्या 14 तारखेपासून भगीरथ भालके हे मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. ही यात्रा ज्या गावात जाईल त्याच गावात ते मुक्काम करणार आहेत. त्यातून मतदारांशी जवळकिता वाढविण्याचा भालके यांचा प्रयत्न असणार आहे. ‘नानांच्या जनसेवेचा रथ, चालवेल आपला भगीरथ’ या स्लोगनखाली ही यात्रा काढली जात आहे.

या यात्रेच्या माध्यमातून भगीरथ भालके हे जनमत आपल्या बाजून वळविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यातून उमेदवारीचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न भालके यांचा दिसत आहे. मात्र, भालके नेमके कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Bhagirath Bhalke
Shiv Sena : काँग्रेसकडील मतदारसंघातून शिवसेना फुंकणार सोलापुरातून विधानसभेसाठी रणशिंग

तुतारी नेमकी कोणाला मिळणार?

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडे विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक इच्छूकांनी उमेदवारी मागणी केली आहे. त्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी सभापती वसंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे मंगळेवढा तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनीही उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची तुतारी नेमकी कोणाला मिळणार, याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com