Pandharpur Politics : विधानसभेसाठी भगीरथ भालके पुन्हा स्वगृही येणार की काँग्रेसचा ‘हात’ हातात घेणार?

Assembly Election 2024 : समाधान आवताडे हे विद्यमान आमदार असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार, याची उत्सुकता असणार आहे. भालके अपक्ष लढणार की काँग्रेस-राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा विधानसभा लढविणार, याकडे सर्वांचे लक्ष असते.
Prashant Paricharak-Abhijeet Patil-Samadhan Autade-Bhagirath Bhalke
Prashant Paricharak-Abhijeet Patil-Samadhan Autade-Bhagirath BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 May : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवारांसोबत असणारे विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील कारखान्यावरील कारवाईनंतर भाजपसोबत गेले. भारत राष्ट्र समितीचे नेते भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदेंना साथ दिली. समाधान आवताडे हे विद्यमान आमदार असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळू शकते. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण लढणार, याची उत्सुकता असणार आहे. भालके अपक्ष लढणार की काँग्रेस-राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा विधानसभा लढविणार, याकडे सर्वांचे लक्ष असते.

पंढरपूर-मंगळवेढ्यातून (Pandharpur-Mangalvedha) महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या पाठीशी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे, परिचारक समर्थक दामाजी कारखान्याचे अध्यक्ष व इतर नेत्यांची ताकद होती. बहुतांश सर्व नेते एकीकडे असताना विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी मात्र प्रणिती शिंदे यांच्यासाठी एकाकी खिंड लढवली. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मदत करण्याचा शब्द त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून घेतल्याची माहिती आहे.

Prashant Paricharak-Abhijeet Patil-Samadhan Autade-Bhagirath Bhalke
Pune Porshe crash case : ‘स्वतःचं ठेवायचं झाकून अन्‌ दुसऱ्याचं पहायचं वाकून; आव्हाडांची जुनी खोड’

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भगीरथ भालके यांच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहे. दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत आलेला आहे. भालके हे सध्या तांत्रिकदृष्ट्या बीआरएसचे सदस्य आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यापुढे सध्या दोनच पर्याय उपलब्ध आहेत. एक तर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायची अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा लढविणे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार येऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यासमोर आता दोनच पर्याय असून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण विधानसभेसाठी सर्वाधिक इच्छूक हे भाजपकडे असणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचीही भूमिकाही महत्वाची असणार आहे. भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा इच्छूक आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. विठ्ठल साखर कारखान्याचे अभिजित पाटील यांची आमदार होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार आणि इतर नेते कोणती भूमिका घेणार हेही महत्वाचे ठरणार आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजीत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत गेले. विठ्ठल कारखान्यावर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांच्यासंदर्भात जे तुमच्या मनात आहे, ते आमच्या मनात आहे, असे पवार स्टाईल विधान केले आहे, त्यामुळे ऐनवेळी अभिजित पाटील हेही भाजपचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात, असे बोलले जात आहे.

Prashant Paricharak-Abhijeet Patil-Samadhan Autade-Bhagirath Bhalke
Solapur Congress : सोलापूर काँग्रेसला भीती कशाची?; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मोठी मागणी....

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात महायुतीकडे नेत्यांचा भरणा असूनही या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना भरभक्कम पाठिंबा मिळण्याच्या अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही. या मतदारसंघातून प्रणिती शिंदे मताधिक्क्य घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंढरपूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत विधानसभेची आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे.

वास्तविक पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा ही महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती, त्यामुळे ही जागा कोणाला सुटते, यावरही बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत, त्यामुळे भगीरथ भालके हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, हेही पाहावे लागेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी पुन्हा पक्षांतराच्या घटना घडतात, हेही पाहवे लागणार आहे.

Prashant Paricharak-Abhijeet Patil-Samadhan Autade-Bhagirath Bhalke
Cotton Seed Issue : 'वाढत्या तापमानामुळे कलम 144 लावता; त्याच उन्हात शेतकऱ्यांना बियाणांसाठी तासनतास उभे कसे करता?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com