Sharad Pawar Politics : पंढरपूर विधानसभेसाठी इच्छूक तीन नेत्यांनी एकत्रित घेतली पवारांची भेट; मोहिते पाटील ॲक्शन मोडवर

Pandharpur Assembly Constituency : शरद पवार यांना भेटलेल्या नेत्यांमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरची माजी उपनरागध्यक्ष नागेश भोसले, काही दिवसांपूर्वीच पांडुरंग परिवारातून बाहेर पडलेले वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे.
Three Leader Meet Sharad Pawar
Three Leader Meet Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 September : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या तीन नेत्यांनी आज एकत्रितरित्या बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आता यातील तिघांपैकी उमेदवारी लॉटरी नेमकी कोणाला लागणार की नवीन चेहरा समोर येणार, याची उत्सुकता आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटलेल्या नेत्यांमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरची माजी उपनरागध्यक्ष नागेश भोसले, काही दिवसांपूर्वीच पांडुरंग परिवारातून बाहेर पडलेले वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे. आणखी एका परिचारक समर्थकाने पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, पंढरपूरचे माजी उपनराध्यक्ष नागेश भोसले (Nagesh Bhosale), आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, मोहिते पाटील समर्थक वसंत देशमुख, काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकर, मंगळवेढ्याचे प्रथमेश पाटील यांनी आज बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे.

तसेच, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूपंत शिंदे, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, पंढरपूर मंगळेवढा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर कौवठाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभरी, मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष रंधवे हे मंगळवेढ्यातील नेतेही उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकाच वेळी भेट घेतल्याने पंढरपूर मंगळवेढ्याचा उमेदवारीचा निर्णय झाला की काय, अशी चर्चा आता रंगली आहे.

नागेश भोसले हे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती, त्यामुळे पवारांसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली, याची उत्सुकता आहे.

Three Leader Meet Sharad Pawar
Shiv Sena : काँग्रेसकडील मतदारसंघातून शिवसेना फुंकणार सोलापुरातून विधानसभेसाठी रणशिंग

उमेदवारीसाठी अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत, त्यामुळे पंढरपुरात तुतारीची उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनीही पंढरपूर-मंगळेवढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. तसेच, वसंतराव देशमुख यांनीही तुतारीकडून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुतारी नेमकी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या भेटीचा तपशील समजू शकला नसला तरी या सर्व नेत्यांशी पवारांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. आता शरद पवार यातील कोणाला उमेदवारी देणार की ऐनवेळी नवीन चेहरा पुढे आणणार, याबाबत औत्सुक्य आहे.

Three Leader Meet Sharad Pawar
Nagpur Hit and Run Case : पोलिस बावनकुळेंच्या मुलावर मेहेरबान; वैद्यकीय चाचणी न करताच सोडून दिले, मित्रांची मात्र चाचणी

मोहिते पाटलांची भूमिका ठरणार महत्वाची

या भेटीवेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही उपस्थित होते. माढा मतदारसंघातील उमेदवार ठरवताना मोहिते पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे एका नावावर एकमत करण्याचा मोहिते पाटील यांचा प्रयत्न असल्याचे आजच्या बैठकीतून दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com