Bhagirath Bhalke News : पंढरपूर-मंगळवेढ्यातून विधानसभेची आरपारची लढाई लढणार : राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंची घोषणा

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळेंना पाठिंबा देण्याचा निर्णय भालके गटाने जाहीर केला आहे.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama

Solapur News : विधानसभेची आगामी निवडणूक मी पंढरपूर (Pandharpur)-मंगळवेढा मतदारसंघातून अटीतटीची आणि आरपारची लढाई म्हणूनच लढणार आहे. माझ्या नेत्याने दिलेला स्वाभिमानाचा आणि राखून ठेवलेला डावसुद्धा मला टाकावा लागणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी केली. भालके यांच्या घोषणेने विठ्ठल परिवारात फूट पडणार, हे आता स्पष्ट झाले आहे. (Bhagirath Bhalke's announcement to contest upcoming assembly elections)

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि आमदार (स्व.) भारत भालके गटाची पुढची राजकिय दिशा ठरविण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची पंढरपुरातील नवीन कोर्टाजवळील निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्यात भालके यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तसेच, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीत कल्याणराव काळेंना पाठिंबा देण्याचा निर्णय भालके गटाने जाहीर केला आहे.

Bhagirath Bhalke
Daund Bazar Samiti: राहुल कुलांनी उलथवली राष्ट्रवादी सत्ता ; दौंड बाजार समितीवर प्रथमच भाजपचे वर्चस्व

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी नुकताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वाभूमीवर मागील पोटनिवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेले भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) गटाच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. भगीरथ भालके यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विधानसभेची आगामी निवडणूक मी पंढरपूर मतदारसंघातून अटीतटीची आणि आरपारची लढाई म्हणूनच लढणार आहे. त्यावेळी मी जिथं कुठे असेन, त्या ठिकाणी वडिलकीच्या भावनाने माझ्या पाठीशी तुम्हाला उभे राहावं लागणार आहे, अशी अपेक्षा भालके यांनी कल्याणराव काळे यांच्याकडून व्यक्त केली.

Bhagirath Bhalke
Sangola APMC News: सांगोल्यात पुन्हा शेकापचा बोलबाला... सूतगिरणी, खरेदी-विक्रीसंघानंतर बाजार समितीवरही फडकावला झेंडा!

भालके म्हणाले की, भारतनाना भालकेंनी २००९ मध्ये रिडारोलसकडून, २०१४ मध्ये काँग्रेसकडून, तर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली. सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपकडे जात असताना भारत भालके यांनी मात्र शरद पवार यांच्या विचाराबरोबर जात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. भारतनाना जरी वेगळ्या पक्षात असले तरी पवार यांच्यावर निष्ठा ठेवली हेाती. आम्ही सुद्धा भारतनानांच्या विचाराचा कार्यकर्त्या असल्यामुळे पक्षावर प्रेम केले आहे. पण, अभिजीत पाटील यांच्या प्रवेशानंतर तालुक्यात जी चर्चा, कार्यकर्त्याची घुसमट हेाती, त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी आज बैठक घेतली होती.

Bhagirath Bhalke
Bullock Cart Race: वाढदिवस, राजकीय कार्यक्रमांना भरणाऱ्या बैलगाडा शर्यतींना ब्रेक : ‘भिर्रर्र...उचल की टाक...’ फक्त यात्रा-जत्रांतच घुमणार

जनता हाच नानांचा पक्ष होता. पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे नाना हेच आमचे पक्ष असे मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे लोक सांगतील तोच आमचा पक्ष यापुढच्या काळात असणार आहे. लोक सांगतील तीच माझी भूमिका आहे, असेही भालके यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com