Daund APMC News : भाजप आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त दणका दिला आहे. दौंड बाजार समितीवर स्थापनेपासून म्हणजे १९५९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात गटाची सत्ता होती. ती उलथवून टाकण्यात आमदार कुल यांना प्रथमच यश आहे. कुल यांच्या माध्यमातून दौंड बाजार समितीवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. (BJP MLA Rahul Kul's rule on Daund Bazar Samiti)
भाजप समर्थक गणेश जगदाळे (लिंगाळी) यांची दौंड (Daund) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) सभापतिपदी, तर उपसभापतिपदी शरद कोळपे (दहिटणे) यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे मागील पंचवार्षिकमध्ये थोरात गटाची एकहाती सत्ता होती. या निवडणुकीत राहुल कुल यांनी नऊ जागा जिंकत राष्ट्रवादीचे थोरात यांच्याशी बरोबर केली होती.
दौंड बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनेलने ९, तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलनेही ९ जागा जिंकल्या होत्या. मात्र, व्यापारी मतदारसंघातील शेतकरी विकास पॅनेलमधून निवडून आलेले संचालक संपतराव निंबाळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर भाजप पुरस्कृत पॅनेलचे०९, राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचे ८ , असे संख्याबळ झाले.
दौंड बाजार समितीच्या अध्यासी अधिकारी, सहायक निबंधक (सहकार) हर्षित तावरे यांच्या देखरेखीत सभापती आणि उपसभापती निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. सभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे गणेश जगदाळे व शेतकरी विकास पॅनेलचे बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज दाखल केले. गुप्त पध्दतीने झालेल्या मतदानात गणेश जगदाळे यांना ९ तर बाळासाहेब शिंदे यांना ८ मते पडली.
उपसभापतिपदासाठी जनसेवा पॅनेलचे शरद कोळपे व शेतकरी विकास पॅनेलच्या वर्षा मोरे यांच्यात लढत झाली. शरद कोळपे यांना ९ तर वर्षा मोरे यांना ८ मते पडली. मतमोजणीनंतर हर्षित तावरे यांनी सभापतिपदावर (Sabhapati) गणेश जगदाळे व उपसभापतिपदी शरद कोळपे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गणेश जगदाळे हे लिंगाळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य आहेत. शरद कोळपे हे दहिटणे सोसायटीचे माजी चेअरमन आहेत.
जगदाळे ठरले २९ वे सभापती
दौंड बाजार समितीची स्थापना १९५९ मध्ये झाली आहे. दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हुकुमचंद मोतीलाल टाटिया हे संस्थापक सभापती होते. हुकुमचंद टाटिया यांनी `सकाळ` चे बातमीदार म्हणून काम पाहिले होते. ते १९५९ ते १९७१ या दरम्यान सभापती होते. नूतन सभापती गणेश जगदाळे बाजार समितीचे २९ वे सभापती आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.