Bhanudas Murkute Ahmednagar : भानुदास मुरकुटे आजी-माजी मंत्र्यांवर बरसले; म्हणाले, 'सत्तेसाठी विखे-थोरातांची...'

Balasaheb Thorat And Radakrishna Vikhe Patil : संगमनेर आणि प्रवरा कारखान्याने अशोक कारखना कार्यक्षेत्रातील ऊस नेऊ नये
Bhanudas Murkute, Balasaheb Thorat, Radakrishna Vikhe Patil
Bhanudas Murkute, Balasaheb Thorat, Radakrishna Vikhe Patil Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची छुपी युती असून ते मिलीभगत करून सत्ता मिळतात. सत्तेसाठी त्यांनी आतापर्यंत इतरांवर सतत अन्याय केला आहे, असा घणाघात माजी आमदार आणि बीआरएस पक्षाचे नेते भानुदास मुरकुटे यांनी केला आहे. यामुळे नगरचे राजकारण तापणार आहे. मुरकुटेंनी केलेल्या गंभीर आरोपांना आजी-माजी मंत्री काय उत्तर देणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Latest Political News)

समन्यायी पाणी कायद्याबाबत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) ओरड करत आहेत. मात्र मंत्री असताना सन २००५ साली त्यांनीच विधानपरिषदेत कायदा आणला होता. आता तेच दिशाभूल करत जिल्ह्यातील इतर नेत्यांना दूषणे देत आहेत. अशोक सहकारी साखर कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुरकुटे यांनी 'श्रीगणेश'प्रमाणेच अशोक कारखान्याचा ऊस संगमनेर आणि प्रवरा कारखान्याने नेऊ नये, असे थोरात-विखेंना सुनावले.

Bhanudas Murkute, Balasaheb Thorat, Radakrishna Vikhe Patil
Ganesh Sakhar Karkhana : नगरच्या राजकारणात 'गणेश' ठरतोय कळीचा मुद्दा; काय आहे कारण?

भंडारदऱ्याचे पाणी आपल्या श्रीरामपूर भागाला मिळण्यासाठी वेळप्रसंगी लढा व आंदोलने करावी लागतील. त्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविली पाहिजे. भंडारदऱ्याचे पाणी आधी निळवंडेत येते. त्यामुळे या पाण्याचा अकोले व संगमनेर भागात गैरवापर होण्याची शक्यता आहे, असा संशय व्यक्त करत मुरकुटेंनी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना जागरूक राहावे लागेल, असे आवाहनही केले. (Maharashtra Political News)

'आम्हीही शंभर कोटींचा इथेनॉल प्रकल्प, शंभर कोटींचा डिस्टीलरी प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प यासह पॉलिटेक्निक, डी.फार्मसी व महाविद्यालय, आय.टी.आय. व दोन स्कूल असे शिक्षण संकूल उभे केले. त्याबद्दल आरोप करणारे शब्दभरही बोलत नाहीत. 'जिल्ह्यातील काही कारखान्यांकडे उपपदार्थ, वीजनिर्मिती प्रकल्प असतानाही कमी भाव देतात. त्यासंदर्भात जाणीवपूर्वक माहिती दिली जात नाही,' असा आरोप मुरकुटे यांनी केला.

अशोक आणि इतर कारखान्यांनी दिलेल्या दराची तुलना करत मुरकुटेंनी जिल्ह्यातील नेत्यांचा समाचार घेतला. 'वृध्देश्वर (अडीच हजार), मुळा (दोन हजार ४५०), प्रवरा (दोन हजार ३४४), ज्ञानेश्वर (दोन हजार ४००) तर अशोक कारखान्याने दोन हजार ५७३ रुपये भाव दिला. त्याबद्दल कौतुक नाही. अनेक कारखाने बाहेरुन ऊस आणतात. त्यांना वेगळा व कमी भाव देतात. आपण असा दुजाभाव करीत नाही. याबाबत बोलण्याची दानत टीकाकार दाखवत नाहीत,' अशी खोचक टोला मुरकुटेंनी उत्तरेतील इतर कारखानदारांना लगावला.

ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना मुरकुटे यांनी आपल्या भाषणात खडेबोल सुनावले. ‘अशोक'वर टीका करणारे, आंदोलने करणाऱ्यांमध्ये इतर कारखान्यांवर जाऊन आंदोलन करण्याची हिम्मत नाही, असे मुरकुटे यांनी खडसावले.

(Edited by Sunil Dhumal)

Bhanudas Murkute, Balasaheb Thorat, Radakrishna Vikhe Patil
Akola Crime News : बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींसह सचिवाला लाच घेणं भोवलं; 'लाचलुचपत'ची मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com