मुरकुटेंची विजयी घोडदौड : 21-0 च्या तयारीत

अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Banudas Murkute ) यांच्या समोर त्यांचीच सून असलेल्या डॉ. वंदना मुरकुटे ( Dr. Vandana Murkute ) व शेतकरी संघटनेने मोठे आव्हान उभे केले होते.
Ashok Sahakari Sakhar Karkhana
Ashok Sahakari Sakhar KarkhanaSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रियेने श्रीगोंदा व श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले. श्रीगोंद्यातील नागवडे साखर कारखान्यावर राजेंद्र नागवडे यांनी वर्चस्व राखले. त्याच निवडणुकीची पुनरावृत्ती श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Banudas Murkute ) यांनी करून दाखविली आहे. त्यामुळे राजेंद्र नागवडे यांच्या प्रमाणे भानुदास मुरकुटे यांनीही गड राखत विरोधकांना आस्मान दाखविले. भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा विकास पॅनेलची सध्या 21-0 अश्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. Bhanudas Murkute's panel won 12 seats in Ashok Sahakari Karkhana

या कारखान्यावर भानुदास मुरकुटे यांचे 30 पेक्षाही जास्त वर्षांपासून वर्चस्व आहे. या निवडणुकीत त्यांना माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजिव करण ससाणे यांनी साथ दिली आहे. तर शेतकरी संघटनेने त्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे. शेतकरी संघटनेच्या पॅनेलमध्ये श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे, श्रीरामपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांचाही समावेश आहे. त्यामुळे कधी नव्हेते अशोक साखर कारखाना निवडणुकीत भानुदास मुरकुटे यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान उभे केले होते.

Ashok Sahakari Sakhar Karkhana
भानुदास मुरकुटे सत्ता राखणार की सूनबाई सूत्रे हाती घेणार!

श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडीसाठी रविवारी (ता. 16) मतदान प्रक्रिया झाली. कारखान्याच्या 11 हजार 774 सभासद मतदारांपैकी 10 हजार 898 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारखान्यासाठी एकूण 93 टक्के मतदान झाले. आज मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यापासून लोकसेवा विकास पॅनेलने आघाडी कायम राखली आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत 21 पैकी 12 जागांचे निकाल हाती आले. यात सर्व 12 जागांवर लोकसेवा पॅनेलचे उमेदवारांनी विजय मिळविला. उर्वरित सर्व जागांवर लोकसेवा पॅनेलच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागवडे यांच्या प्रमाणेच भानुदास मुरकुटेही आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरले आहेत. भानुदास मुरकुटे यांची सून असलेल्या डॉ. वंदना मुरकुटे व लोकसेवा विकास आघाडीचे पुंजाहरी शिंदे यांच्यात तुल्यबळ लढत सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com