K Chandrashekar Rao : चंद्रशेखर राव काँग्रेसला देणार मोठा धक्का; दोन आमदार 'बीआरएस'मध्ये करणार प्रवेश?

BSR : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
K Chandrashekar Rao
K Chandrashekar Rao Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाने महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 'बीआरएस'ची 24 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. या सभेला चंद्रशेखर राव हे उपस्थित असणार आहेत. मात्र, याच सभेत चंद्रशेखर राव हे काँग्रेस आणि 'आप'ला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे.

K Chandrashekar Rao
Chandrakant Patil on Babri: बाळासाहेबांनी चार सरदार पाठवले होते का? बाबरी पाडायला एकही शिवसैनिक नव्हता; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

काँग्रेसचे दोन आमदार पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात दोन आमदार प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मग ते दोन आमदार कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. जर असं झालं तर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.

K Chandrashekar Rao
Nagpur MNS News : आयुक्त तुम्ही पाकिस्तानचे आहात का? पाण्यासाठी मनसे आक्रमक !

तसेच आपचेही काही नेते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. दरम्यान, या आधी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. तर बीडमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com