Bharati Lad : पतंगराव कदमांच्या कन्या 'भारती लाड' यांचं निधन; विश्वजीत कदमांचं मायेचं छत्र हरपलं

Patangrao Kadam News : काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली.
Late Bharati Lad, daughter of Congress leader Patangrao Kadam
Late Bharati Lad, daughter of Congress leader Patangrao KadamSarkarnama
Published on
Updated on

Patangrao Kadam News : काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी बहिणीच्या निधनाची माहिती देत त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. पतंगराव कदम यांनी 'भारती' यांच्याच नावाने शैक्षणिक आणि इतर संस्था उभारल्या आहेत.

भारती लाड यांचा अल्प परिचय :

भारती लाड यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी कडेगावमधील सोनसळमध्ये झाला. त्यांच्याच नावाने पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाचे साम्राज्य उभे केले. आज भारती हे अभिमत विद्यापीठ असून संस्थेत पूर्व प्राथमिक ते पीएचडी पर्यंत शिक्षण देणारे शाळा, महाविद्यालय आहेत. अत्याधुनिक रुग्णालय, कारखाने आहेत.

Late Bharati Lad, daughter of Congress leader Patangrao Kadam
Congress news : काँग्रेस नवीन पदाधिकाऱ्यांच्या शोधात; थोरात अन् आहेर यांच्या दौऱ्याला कितपत यश येणार?

भारती यांनीही वडिलांना मोलाची साथ दिली. त्यांनी देखील वडिलांचा राजकीय आणि सामाजिक वारसा जपला होता. भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल अशा संस्था उभा केल्या. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी, महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

1993 मध्ये भारती यांचा महेंद्र लाड यांच्याशी विवाह झाला. महेंद्र लाड हे जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. तर ऋषिकेश आणि रोहन अशी दोन मुले आहेत. महेंद्र लाड हेही राजकारणात सक्रिय असल्याने भारती यांनी लग्नानंतर घर, कुटुंब आणि सामाजिक कार्य अशी तिहेरी जबाबदारी संभाळली.

Late Bharati Lad, daughter of Congress leader Patangrao Kadam
Sangli Congress : ‘धूळ साचली आहे, थोडी फुंकर मारावी लागेल’, काँग्रेस नेत्याने दिले बदलाचे संकेत

दोन आठवड्यांपूर्वी भारती लाड यांनी चक्कर आली. त्यानंतर सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला उपचार केल्यानंतर त्यांना पुण्याला नेण्यात आले. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

आमदार विश्वजीत कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण भारती लाड यांना श्रद्धांजली वाहिली. "माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com