Kolhapur Politics : 'बिद्री-भोगावती'चे बिगुल वाजणार? आजी-माजी आमदारांची लिटमस टेस्ट

Prakash Abitkar Vs K P Patil : के. पी. पाटील विरुद्ध आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात बिद्री कारखान्यावरून उघड संघर्ष...
Prakash Abitkar
Prakash AbitkarSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर -

Kolhapur News : पावसाळ्यामुळे राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात महिनाभरापासून बिद्री, भोगावती सहकारी साखर कारखान्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. माजी आमदार के. पी. पाटील विरुद्ध आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात बिद्री कारखान्यावरून उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, स्थगिती मिळालेल्या निर्णयाची स्थगिती उठण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबर (मंगळवार) पासून संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात बिद्री व भोगावतीवरून कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभेची लिटमस टेस्ट पाहायला मिळणार आहे.

Prakash Abitkar
Satara NCP News : अजितदादांनी दिली रामराजेंच्या बंधूंवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी....

भोगावती सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्जापर्यंत पूर्ण झाली होती. छाननी बाकी असतानाच याबाबतची स्थगिती सहकार विभागाने दिली होती. आता छाननीपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यामुळे आता निवडणुकांसाठी सर्वच जय्यत तयारीला लागले आहेत, तर दुसरीकडे कागल तालुक्यातील बिजली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची अंतिम यादी जाहीर झाली होती.

स्थगिती उठल्यानंतर आता थेट उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून या निवडणुकीला सुरुवात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानंतर सर्वात चुरशीची लढत होती, ती म्हणजे कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याची. माजी आमदार के. पी. पाटील आणि विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यातील उघड संघर्ष बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळतो. आमदार प्रकाश आबिटकर यांनी बिद्री सहकारी कारखान्याची लेखापरीक्षणाची मागणी केली होती. मात्र, माजी आमदार के. पी. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने त्याची धार कमी झाली आहे.

Prakash Abitkar
Kolhapur-Sangli Politics : कोल्हापूर, सांगली भाजपत अंतर्गत वादाची ठिणगी; बावनकुळे कसा सोडवणार तिढा ?
Prakash Abitkar
BJP MP News : भाजप खासदारांचा पत्ता कट होणार? सुमार कामगिरी असलेल्यांना नारळ...

सहकार विभागाने संस्था निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बिद्री, भोगावती'सह' राज्यातील दोन हजार संस्थांची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्यात सर्वाधिक १९१० संस्था दुग्ध विभागातील आहेत. निवडणुकांना जिथून स्थगिती दिली होती, तेथूनच आता प्रक्रियेला सुरू होणार आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com