Bidri Sakhar Karkhana : शिंदे गटाला दिलेला पाठिंबा ठाकरे गटाला खुपला, तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची पदावरून हकालपट्टी

Bidri Sakhar Karkhana kagal News : कोल्हापुरात बिद्री सहकारी साखर कारखान्याचं राजकारण तापलं.
Bidri Sakhar Karkhana
Bidri Sakhar Karkhana Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगात आली असताना ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखांनी शिंदे गटाच्या आमदार गटाला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे गटाने तडकाफडकी निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी तालुकाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांना पदावरून हकालपट्टी केली आहे.एकीकडे राजकारण आणि सहकारातील राजकारण वेगवेगळे समजत असताना ठाकरे गटाला पदाधिकाऱ्यांची भूमिका डोळ्यात खुपली असल्याचं बोललं जात आहे.

Bidri Sakhar Karkhana
Raju Shetty Protest : ऊसदरावरून 'स्वाभिमानी' आक्रमक; पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला

जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी पत्रक काढून माहिती दिली. शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार पदमुक्त करण्यात आले आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी भिकाजी गणपती हळदकर, के.के. राजगिरे, बाबूराव ज्ञानदेव बसरवाडकर,अरविंद वसंत बुजरे,राहुल पांडुरंग जरग यांना पक्षादेश न पाळणे व पक्षविरोधी भूमिका घेतल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पदमुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

ठाकरे गटात नेमके काय घडले ?

बिद्री सहकारी कारखान्याच्या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे ए. वाय. पाटील यांच्या गटाला राधानगरी तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखांनी व अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये तालुकाप्रमुख भिकाजी गणपती हळदकर, उपप्रमुख के.के. राजगिरे, विभागप्रमुख बाबूराव ज्ञानदेव बसरवाडकर, अरविंद वसंत बुजरे, राहुल पांडुरंग जरग, सदाशिव जोती पाटील, अवधूत पाटील, नामदेव मुसळे यांचा समावेश आहे.

Edited: Rashmi Mane

Bidri Sakhar Karkhana
Dilip Walse Patil - Shetti : "...म्हणून 'स्वाभिमानी'ने आंदोलन मागे घ्यावे!"; मंत्री वळसे पाटलांची शेट्टींना विनंती

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com