Sangli News: माजी चेअरमनच्या मेव्हण्याला पुरस्कार; सांगली शिक्षण सेवक सोसायटीत शिक्षकांमध्येच जुंपली

Maharashtra Politics: सांगली शिक्षण सेवक सोसायटीत हजारो शिक्षक सभासद आहेत.
Sangali News:
Sangali News:Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांना शिस्त असणे गरजेचे असते. पण सांगलीच्या शिक्षण सेवक सोसायटीच्या सभेत झालेला गोंधळ पाहून शिक्षकांच्या शिस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. यामुळे सांगली शिक्षण सेवक सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सांगली शिक्षण सेवक सोसायटीत हजारो शिक्षक सभासद आहेत. अनेक उपयोगी उपक्रम ही सोसायटीकडून राबवले जात असतात. शिक्षकांच्या ठेवी आणि ऐनवेळी लागणाऱ्या कर्जासाठी ही सोसायटी उपयोगी आहे. मात्र अंतर्गत राजकारणामुळे ही सोसायटी सतत चर्चेत असते. सोसायटीची नुकतीच ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र किरकोळ कारणांवरून सभेत मोठा गोंधळ झाला. सभासद एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिस्थिती चांगलीच चिघळली होती. (Sangli Political News)

Sangali News:
Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंना आक्षेपार्ह विधानाप्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

माजी चेअरमनच्या मेव्हण्याला पुरस्कार दिल्याने काही सभासद नाराज झाले होते. त्यातून सभेत गदारोळ सुरू झाला. काही सभासद अध्यक्षांसमोरच भिडल्याने काही काळ सभा तहकूब करावी लागली. त्यानंतर पुन्हा सभा सुरू करण्यात आली. (Sangali News) या सभेत सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचा निर्णय झाला. मात्र विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देणाऱ्या शिक्षकांचं असं वागणं पाहून हे सर्व चुकीचं असल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com