Jayant Patil : पत्रिका दिली; मातोश्रीवर फोन केले, तरीही ठाकरे जयंतरावांच्या मुलाच्या लग्नाला आलेच नाहीत

माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक आणि ज्येष्ठ उद्योजक राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा विवाह मोठ्या धुमडक्यात झाला.
Pratik Patil wedding
Pratik Patil weddingSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे चिरंजीव प्रतिक आणि ज्येष्ठ उद्योजक राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा विवाह मोठ्या धुमडक्यात झाला. या शाही विवाह सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. विशेषतः जयंत पाटील आणि नवरदेव प्रतीक यांनी मातोश्रीवर फोन करूनही ठाकरे मात्र पाटलांच्या लग्न मांडवात आलेच नाहीत, त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Uddhav and Aditya Thackeray did not come to Jayant Patil's son's wedding)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक आणि उद्योजक राहुल किर्लोस्कर यांची मुलगी अलिका यांच्या शाही विवाह सोहळा रविवार मोठ्या जल्लोषात झाला. या विवाह सोहळ्याच्या भव्यदिव्यतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री, मात्री मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह महाविकास आघाडीसह सर्वपक्षीत नेत्यांनी लग्नाला हजेरी लावून पाटील- किर्लोस्कर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र पाटलांचा मान राखला नाही.

Pratik Patil wedding
Maharashtra-Karnataka Border Dispute : मुख्यमंत्री बोम्मई दिल्लीत दाखल; मुकुल रोहतगींशी चर्चा करणार

जयंत पाटील यांनी ठाकरे यांना लग्नपत्रिका दिली हेाती. याशिवाय खुद्द पाटील आणि अगदी नवरदेवाने लग्नाच्या दिवशी मातोश्रीवर १०-१२ वेळा फोन करूनही ठाकरे कुटुंबीय पाटील- किर्लोस्कर यांच्या लग्न मांडवात आलेच नाहीत. एवढा मान देऊनही उद्ध ठाकरे किंवा आदित्य ठाकरेही न आल्याने नवरदेव प्रतीक पाटील हे ठाकरे कुटुंबीयांवर रूसलयाची चर्चा आहे.

Pratik Patil wedding
Maharashtra-Karnataka Border Dispute : अक्कलकोटहून कर्नाटकात जाणारी एसटी वाहतूक बंद

दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही ठाकरे हे जयंत पाटलांपासून लांब राहात होते. तर, पाटील हेही कधी ठाकरेंकडे जात नसल्याचे दिसून येत होते. तरीही, मुलाच्या लग्नाला उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी यावे; म्हणून पाटील-किर्लोस्कर कुटुंबीयांनी हट्ट केला होता. परंतू, ठाकरे हे पाटलांच्या लग्न मांडवात अखेर आलेच नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com