Big Political Developments : पवारांच्या खासदारांचा खळबळजनक दावा; देशात अन्‌ राज्यात सहा महिन्यांत मोठ्या राजकीय घडामोडी घडणार

Dhairyasheel Mohite Patil Statement : ष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी येत्या सहा महिन्यांत देशात मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचा दावा केला असून राष्ट्रीय स्तरावर बदलांचे संकेत दिले आहेत.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on
  1. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा केला की पुढील सहा महिन्यांत देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर त्याचा परिणाम दिसेल.

  2. सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडी किंवा स्थानिक आघाड्यांची सत्ता येईल, तर भाजप फक्त १–२ ठिकाणीच विजयी होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

  3. अकलूजमधील ईव्हीएम बिघाड तांत्रिक कारणाने झाल्याचे सांगत, टीका, मनी पॉवर आणि आरोपांना जनता योग्य उत्तर देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Solapur, 02 December : देशात येत्या सहा महिन्यांत काय बदल आणि घडामोडी घडतील, हे तुम्हा सर्वांना दिसून येईल. देशात घडलं की सगळीकडंच घडत जातं, हे बघा तुम्ही काय काय होतं. हे उद्यापासूनच होणार नाही. पण येत्या सहा महिन्यांत देशात मोठ्या घडामोडी घडतील, पण त्या नक्की घडतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला.

सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांपैकी एक दुसरी वगळता सर्वत्र महाविकास आघाडी आणि स्थानिक विकास आघाडीची सत्ता आलेली आपल्याला दिसून येईल. भाजप सोलापूर जिल्ह्यातील एक ते दोन नगरपालिका निवडणुकीत विजयी होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी केला.

अकलूज (Akluj) नगरपरिषदेच्या मतदानाच्या वेळी एक तासापेक्षा जास्त वेळ एक ईव्हीएम मशीन बंद होतं, हे खरं आहे. तो एक तांत्रिक प्रॉब्लेम होता. निवडणूक आयोगाने एक तासाचा वेळ वाढवून देण्याचे कबूल केले आहे. अशा तांत्रिक गोष्टी घडतच असतात. त्या एवढ्या गांभीर्याने घ्यायच्या नसतात, असेही मोहिते पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून मनी पॉवरचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पण निवडणुकीत त्याचा उलटा परिणाम झालेला दिसेल. पैसे वाटपाचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

मी भाषणातच सांगून टाकलं आहे. हा देश सगळ्या गोष्टी बघत आहे. ते काय करतात. सत्तेचा वापर करून विरोधी पक्षातील लोकांना कशा प्रकारे अडचणीत आणण्याचे काम केले जाते. पुन्हा कोर्टचं निर्णय देतं, कोर्टचं सरकारला झापतं. ह्या प्रकिया हे लोक करतात, म्हणून सांगितलं. पालकमंत्र्यांनी आमच्याबाबत केलेल्या विधानावर आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, असा इशारा मोहिते पाटील यांनी नाव न घेता गोरेंना दिला.

Dhairyasheel Mohite Patil
Solapur Election 2025 : सोलापुरात मोहोळ, सांगोला, कुर्डूवाडी, अकलूज, बार्शी, अक्कलकोटमध्ये EVM मध्ये बिघाड; मशीन बदलून मतदानाला पुन्हा सुरुवात

अकलूजमध्ये आमची दहशत असती तर अनगरसारखं झालं असतं

ते म्हणाले, अकलूजमधील जनतेला आमची दहशत आहे की नाही, हे त्यांना माहिती आहे. अकलूज फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करतं आणि आमचं कुटुंबसुद्धा गावावर तेवढंचं प्रेम करतं. आमची अकलूजमध्ये दहशत असती तर अनगरसारखं झालं असतं. आम्ही लोकशाही मार्गाने लोकांकडे मतं मागत आहोत, आम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही केलेल्या कामाचं मूल्यमापन म्हणजे निवडणूक.

आमच्यावरील टीकेला अकलूजची जनता उत्तर देईल

अनगरमधील उज्वला थिटे यांना न्याय मिळाला आहे. आता पुढे ते काय काय उद्योग करतात, हे बघावे लागेल. आमचं प्रेम गावावर आहे आणि गावाचं प्रेम आमच्यावर आहे. आमच्यावरील टीकेला जनता उत्तर देईल, असेही धैर्यशील मोहिते पाटील यांनी नमूद केले.

Dhairyasheel Mohite Patil
Udayanraje : ऐन मतदानाच्या दिवशी उदयनराजेंचा बॉम्ब; ‘होय, मी एका गोष्टीबाबत नाराज होतो...’

1) धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणता दावा केला?

पुढील सहा महिन्यांत देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा त्यांनी दावा केला.

2) सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीबाबत त्यांनी काय म्हटले?

बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी वा स्थानिक आघाडीची सत्ता येईल, तर भाजप १–२ ठिकाणीच जिंकेल असे त्यांनी सांगितले.

3) अकलूजमधील ईव्हीएम बिघाडाबाबत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

तो तांत्रिक प्रॉब्लेम असून निवडणूक आयोगाने वेळ वाढवला असल्याचे त्यांनी नमूद केले.

4) त्यांच्या विरोधातील टीकेबाबत त्यांनी काय म्हटले?

अकलूजची जनता त्याचे उत्तर देईल आणि लोकशाही मार्गानेच ते मत मागत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com