Udayanraje : ऐन मतदानाच्या दिवशी उदयनराजेंचा बॉम्ब; ‘होय, मी एका गोष्टीबाबत नाराज होतो...’

Satara Nagar Parishad Election 2025 : सातारा नगरपालिका निवडणुकीत मतदानानंतर उदयनराजे भोसले यांनी मजेशीर विधान करत वातावरण हलके केले. फार्म भरायला शिफारस झाली नाही म्हणून नाराजी व्यक्त करत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on
  1. सातारा नगरपालिका निवडणुकीत मतदान उत्साहात सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी विनोदी शैलीत स्वतःलाही फार्म भरायची इच्छा होती, अशी टिप्पणी केली.

  2. उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या संयुक्त पॅनेलमुळे दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपद शिवेंद्रराजेंकडे देण्यात आले आहे.

  3. प्रचारात न दिसल्याने नाराजीच्या चर्चांना उदयनराजेंनी विनोदात उत्तर देत निवडणुकीत भाजपच्या सत्तेबाबत कोणतीही अडचण नाही असे सांगितले.

Satara, 02 December : सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी आज मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एक मजेशीर विधान केले असून त्यामुळे उपस्थितांचे डोळे विस्फारले. ‘होय, मी एक गोष्टीबाबत नाराज होतो, माझी पण फार्म भरण्याची इच्छा होती. माझी कोणी शिफारसच केली नाही, त्यामुळे माझा फार्म भरायचा राहिला,’ असे सांगून उदयनराजेंनी एकच धमाल उडवून दिली.

सातारा नगरपालिका निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंचे मनोमिलन झाले असून दोघांचे संयुक्त पॅनेल निवडणूक लढवत आहे. दोघांच्या संयुक्त पॅनेलमध्ये नगराध्यक्षपद मात्र मंत्री शिवेंद्रराजेंकडे आले आहे. तसेच, खासदार उदयनराजे हे निवडणुकीच्या प्रचारातही कुठे दिसले नाहीत, त्या अनुषंगाने त्यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी उदयनराजेंनी आपण नाराज होतो. पण का तेही स्पष्ट केले आहे.

सातारा (Satara) नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यामध्ये कोणतीही अडचण वाटत नाही, असेही राजेंनी स्पष्ट केले. तसेच, नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही कुठेही दिसला नाहीत, त्यामुळे तुम्ही नाराज असल्याचे चर्चा सातारा शहरात सुरू होती, त्याबाबतही उदयनराजेंनी आपण नाराज नव्हतो. नाराज असून कसं चालणार, असा उलटा सवाल त्यांनी केला.

Udayanraje Bhosale
Nilanga Nagar Palika : निवडणुक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले, अमित देशमुखांचा संताप; पण निलंगा बंदमधून काँग्रेसची माघार!

माझी एकाच गोष्टीबाबत नाराजी होती. माझीही नगरपालिका निवडणुकीसाठी फार्म भरण्याची इच्छा होती. माझा फार्म भरायचा राहिला. माझी कोणी शिफारसच केली नाही, असे सांगून उदयनराजेंनी नेहमीप्रमाणे धमाल उडवून दिली आहे. त्यांच्या उत्तराने मात्र उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. नगरपालिका निवडणुकीत जागा मोजक्याच होत्या. अनेकांना निवडणूक लढविण्याची इच्छा हेाती. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, पण विकास कामांकडे पाहून लोक मतदान करतील, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

उदयनराजे म्हणाले, निवडणूक लढविण्याची इच्छा असण्यात काही गैर नाही. अनेकांना संधी मिळाली नाही, त्यांनी अपक्ष किंवा इतरांकडे जाऊन फार्म भरला आहे. पण विकास कामांकडे पाहून मतदान करतील.

Udayanraje Bhosale
Uddhav Thackeray : 'आता गद्दाराला जाऊन विचारा 'काय धाडी, काय पोलीस...'; 'काय झाडी, काय डोंगर'फेम शहाजीबापू पाटलांवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

1) उदयनराजेंनी कोणते मजेशीर विधान केले?

त्यांनीही फार्म भरायची इच्छा होती पण कोणी शिफारस न केल्याने राहिलं, असे विनोदी विधान केले.

2) सातारा निवडणुकीत कोणत्या पॅनेलचे मनोमिलन झाले?

खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांच्या संयुक्त पॅनेलचे.

3) उदयनराजे प्रचारात का दिसले नाहीत?

त्यांनी नाराजी नसल्याचे सांगून हे फक्त चर्चा असल्याचे स्पष्ट केले.

4) निवडणुकीबाबत उदयनराजेंचे मत काय?

विकास कामांच्या आधारे जनता मतदान करेल आणि भाजपच्या सत्तेला अडथळा नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com