भाजपकडून सत्यजित कदमांना उमेदवारी जाहीर; काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष!

भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची नावे केंद्रीय संसदीय बोर्डाकडे पाठवली होती.
Satyajeet Kadam
Satyajeet Kadam Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (bjp) अखेर सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपने आपल्या उमेदवारीचे पत्ते उघड केल्याने आता काँग्रेसच्या (congress) उमेदवारीची उत्सुकता कोल्हापूरकरांना लागून राहिली आहे. विशेष म्हणजे सत्यजित कदम यांनी २०१४ ची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. (BJP announces candidature for Satyajit Kadam for Kolhapur North by-election)

भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची नावे केंद्रीय संसदीय बोर्डाकडे पाठवली होती. त्यातही सत्यजित कदम यांच्या नावावर महाराष्ट्र भाजपचे एकमत झाले होते. त्यामुळे राज्यातील नेत्यांचा कदम यांच्यासाठी आग्रह होता. राज्यातील भाजप नेत्यांची मागणी मान्य करत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून सत्यजित कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Satyajeet Kadam
कोल्हापूरच्या राजकारणात ट्विस्ट : शिवसेनेचे राजेश क्षीरसागर ‘नॉट रिचेबल’!

ही पोटनिवडणूक भाजपचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली लढविण्यात येणार आहे. निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीसाठी इच्छूक असलेले महेश जाधव यांची निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक संचालन समिती नियुक्त करण्याचे अधिकार या तीन नेत्यांना देण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Satyajeet Kadam
राज्यातील ‘ती बाब’ अमित शहांच्या निदर्शनास आणून देणार : सुप्रिया सुळे

सत्यजित पाटील-महाडिक पुन्हा आमनेसामने

सत्यजित कदम हे महाडिक गटाचे नातेवाईक असून त्यांच्यासाठी महाडिक परिवार आपली सगळी ताकद पुन्हा एकदा लावणार आहेत. यानिमित्ताने पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक गट पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. यापूर्वी गोकुळमध्ये सतेज पाटलांनी महाडिकांना मात दिली होती. त्यानंतर झालेल्या जिल्हा सहकारी बॅंक आणि विधान परिषदेची निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे गोकुळनंतर पाटील-महाडिकमध्ये यांच्यात पुन्हा निकाराची लढाई दिसून येणार आहे. सत्यजित कदम यांनी २०१४ ची विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांंकाची ४७ हजार मते घेत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना जोरदार टक्कर दिली होती.

Satyajeet Kadam
कोल्हापूर उत्तरसाठी पक्षश्रेष्ठींना दोन नावे कळवली; पण आम्ही या नावावर आग्रही!

काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रतीक्षा

दरम्यान, भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या उमेदवारीकडे कोल्हापूरकरांची लक्ष लागल आहे. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. जाधव यांच्या कुटुंबातच काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरीही सतेज पाटील यांच्या निर्णयाची काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com