कोथरूडमधून भाजप पक्षप्रवेश आणि उमेदवारीचा नवा महामार्ग? इच्छुकांची नेत्यांच्या दारात गर्दी अन् उमेदवारीसाठी धावाधाव...

Pune Local Body Election : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. भाजपकडूनही निवडणुकीसाठी रणनीती आखली जात असून उमेदवारांची चाचपणी केली जातेय.
Chandrakant Patil, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Chandrakant Patil, Murlidhar Mohol, Medha Kulkarni Sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारीसाठी कोथरूड केंद्रबिंदू बनले आहे.

  2. इच्छुक उमेदवार चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वारंवार भेटी देत आहेत.

  3. स्थानिक आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  4. उमेदवारांना नेत्यांची मर्जी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

  5. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे तिकीट वाटप प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारी मिळवण्याचा मार्ग कोथरूडमधून जाताना दिसत आहे. सध्या याची प्रचिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरच्या, कार्यालयाच्या दारात होताना दिसत आहे. इच्छुकांनी आपला मोर्चा चंद्रकांतदादा आणि मोहोळ यांच्या घर अन् कार्यालयाकडे वळवल्याने गर्दी पाहायला मिळत आहे. इच्छुकांनी या नेत्यांच्या घरच्या, कार्यालयाच्या वाऱ्या वाढवल्या असल्याचेही आता बोलेले जात आहे. भाजपच्या स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन या दोन्ही नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी इच्छुकांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.

भाजपच्या शहर कोअर कमिटीमध्ये चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बोडकर आणि श्रीनाथ भिमाले यांचा समावेश आहे. महिन्यातून एकदा होणाऱ्या या कमिटीच्या बैठकींचे सत्र आता वाढले असून, पक्ष प्रवेश आणि उमेदवारीच्या नावांवर चर्चा तीव्र झाली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पक्षप्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेले देखील कोथरूडचा रस्ता पकडत असल्याचं दिसत आहे.

Chandrakant Patil, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Local Body Election : एकछत्री कारभाऱ्यांचे पॉकेट तोडले, हक्काचे भाग जोडले, मात्ताबरांच्या 'या' प्रभागात राजकीय घमासान

आमदारांच्या सूचनांना प्राधान्य

प्रारूप प्रभागरचना तयार करताना माजी नगरसेवकांपेक्षा आमदारांच्या सूचनांना प्राधान्य देण्यात आले आहे. उमेदवारी निश्चितीच्या बाबतीतही आमदारांचा शब्द अंतिम मानला जाण्याची शक्यता आहे. स्थानिक आमदार आणि कोअर कमिटी यांच्यात एकमत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती कोअर कमिटीतील सूत्रांनी दिली. सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या शब्दाला महत्त्व येईल असं देखील बोलत आहे.

कोथरूडमध्ये सर्वाधिक स्पर्धा

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये यंदा सर्वाधिक इच्छुक रिंगणात आहेत. पाटील आणि मोहोळ यांच्या समर्थकांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समर्थकांच्या उमेदवारीवरून चर्चाही झाल्याचे समजते. याशिवाय, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडूनही त्यांच्या समर्थकांसाठी उमेदवारीची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोथरूडमधील उमेदवारी निश्चिती हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मोठा पेच असेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

इच्छुकांची धावपळ

कोथरूडमधील उमेदवारीसाठी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची मर्जी राखणे इच्छुकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. गेल्या काही दिवसांत कोथरूडमधील वाढलेल्या वाऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारीच्या शर्यतीत टिकण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, येत्या काळात कोथरूडमधील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Local Body Elections : महापालिका निवडणुकीच्याआधीच 14 लाख मतदार वाढले; 'स्थानिक'साठी निवडणूक आयोग सज्ज!

FAQs :

प्रश्न 1: भाजप उमेदवारीसाठी कोथरूड का महत्वाचे ठरले आहे?
उत्तर: कारण येथे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा मोठा प्रभाव आहे.

प्रश्न 2: इच्छुक उमेदवार काय करत आहेत?
उत्तर: ते या दोन्ही नेत्यांच्या घरच्या आणि कार्यालयाच्या वाऱ्या करत आहेत.

प्रश्न 3: स्थानिक आमदारांची भूमिका काय आहे?
उत्तर: उमेदवार स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन नेत्यांची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रश्न 4: भाजपच्या उमेदवारीवर कोणाचा प्रभाव आहे?
उत्तर: चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या मर्जीवर उमेदवारी ठरण्याची शक्यता आहे.

प्रश्न 5: या परिस्थितीमुळे काय निर्माण झाले आहे?
उत्तर: उमेदवारांसाठी तारेवरची कसरत आणि भाजपमध्ये अंतर्गत तणाव वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com