Raju More News : गुंतवणूकदारांची भिशी तटली, भाजप नेत्याचे टोकाचे पाऊल, विष घेतले अन्...

BJP Kolhapue Raju More : भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणुकीदारांच्या भीतीने त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. कोट्यावधी रुपये त्यांना परत करायचे होते.
BJP District Secretary Raju More hospitalized after alleged end-life attempt.
BJP District Secretary Raju More hospitalized after alleged end-life attempt.sarkarnama
Published on
Updated on

Raju More News : गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली भिशी वेळेत न देता आल्याने भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पदावरील व्यक्तीने आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरातील भाजप जिल्हा सरचिटणीस राजू मोरे यांनी विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदाराने गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला होता. मात्र वेळेत पैसे देऊ न शकल्याने विष घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेली माहितीनुसार, फुलेवाडीतील एका पतसंस्थेत मोरे हे गुंतवणूकदाराकडून भिशी गोळा करत होते. वर्षाला 24% व्याजदर देऊन लोकांना आमिषाची भुरळ घालून भिशी गोळा करत होते. अनेक गुंतवणूकदारांनी या ठिकाणी पैसे गुंतवले होते. या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी पैसे गुंतवल्याने हे पैसे वेळेत मिळावेत अशी मागणी गुंतवणूकदारांनी मोरे यांच्याकडे केली होती.

मात्र दिलेल्या मुदतीत ही भिशी परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी मोरे यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली होती. दरम्यान सर्व गुंतवणूकदारांना 9 नोव्हेंबर रोजी पैसे देतो असे सांगून कार्यालया जवळ यावे असा निरोप देण्यात आला होता. मात्र गुंतवणूकदारांनी गोंधळ घातल्यानंतर मोरे यांनी विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

BJP District Secretary Raju More hospitalized after alleged end-life attempt.
Anna Hazare : अण्णा हजारेंनी मौन सोडले पण अजब भूमिकेने नवा वाद! गिरीश महाजनांच्या 'त्या' वक्तव्याला समर्थन? म्हणाले, 'लहान ...'

तब्बल आठ कोटींचे देणं

भिशी चालकाने गुरुवारी भिशी फुटणार असे सांगितल्यानंतर गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या दारात 200 हून अधिक गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. जवळपास आठ कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

BJP District Secretary Raju More hospitalized after alleged end-life attempt.
Pune BJP: पुणे महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे तब्बल 2 हजार 350 इच्छुकांची तयारी; उद्यापासून धडधड वाढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com