Shashikant Chavan : भाजप जिल्हाध्यक्षांचे भाग्य उजाळले; शशिकांत चव्हाणांना कार्यकर्त्यांकडून फोर्च्युनर गाडी भेट
भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शशिकांत चव्हाण यांची ३२ वर्षांच्या कामानंतर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या निष्ठेला पक्षाने योग्य सन्मान दिला आहे.
वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना आलिशान फोर्च्युनर गाडी भेट दिली, हा कार्यक्रम पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडला.
चव्हाण यांनी युवा मोर्चा ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास निष्ठा, मेहनत आणि संघटनशक्तीच्या जोरावर पूर्ण केला असून, त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी संदेश दिला आहे.
Mangalvedha, 07 November : भारतीय जनता पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे चीज होते, हे वारंवार दिसून आले आहे. तब्बल ३२ वर्षे भाजपचे काम केल्यानंतर मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण यांच्यासारख्या तळागाळातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पक्ष सत्तेवर आलेला असताना चव्हाण यांना हे वलयाकिंत पद मिळाले. पण, आज वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी शशिकांत चव्हाण यांना आलिशान फोर्च्युनर गाडी भेट देऊन त्यांचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला आहे.
मंगळवेढा शहरातील सांगोला नाका येथे आज भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण (Shashikant Chavan) यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या हस्ते फोर्च्युनर गाडीची चावी जिल्हाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या वेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उद्योजक शंकर जाधव, तालुकाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दिगंबर यादव, सत्यजित सुरवसे, युवा मोर्चाचे सुदर्शन यादव आदीसह भाजप (BJP) पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शशिकांत चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात 1992 पासून काम करण्यास सुरुवात केली. तब्बल 32 वर्षे पक्षासाठी केलेल्या कामाच्या निष्ठेचे फळ जिल्हाध्यक्ष रूपाने शशिकांत चव्हाण यांना मिळाले. सुरुवातीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले, त्यानंतर मंगळवेढा शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. तब्बल सहा वर्षे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले.
याशिवाय, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षे, जिल्हा सरचिटणीस पदावर तीन वर्षे, जिल्हा संघटन सरचिटणीस पदावर तीन वर्षे असे पक्षासाठी तब्बल 32 वर्षे रात्रंदिवस काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती नुकतीच जिल्हाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला नाका येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात आज भाजप समर्थकांनी दिवसभर गर्दी केली होती.
भाजप कार्यकर्ता कोणत्याही पदाचे स्वप्न पाहू शकतो : शशिकांत चव्हाण
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये कार्यकर्ता कोणत्याही पदाची स्वप्न बघू शकतो. मात्र, त्यासाठी पक्षात झोकून देऊन केलेले काम ओळखून पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पक्षामुळे आपला सन्मान वाढला. वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे पक्षासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी स्पष्ट केले
Q1. शशिकांत चव्हाण भाजपमध्ये किती वर्षांपासून कार्यरत आहेत?
A1. ते १९९२ पासून म्हणजेच तब्बल ३२ वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत.
Q2. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोणती भेट देण्यात आली?
A2. त्यांना आलिशान फोर्च्युनर गाडी भेट देण्यात आली.
Q3. फोर्च्युनर गाडीची चावी कोणाच्या हस्ते देण्यात आली?
A3. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गाडीची चावी देण्यात आली.
Q4. शशिकांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना कोणता संदेश दिला?
A4. त्यांनी सांगितले की भाजपमध्ये प्रत्येक कार्यकर्ता कोणत्याही पदाचे स्वप्न पाहू शकतो, जर तो निष्ठेने काम करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

