BJP Politic's : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्याची सूत्रे भाजप निष्ठावंताकडे; परिचारक, क्षीरसागर, बाळराजेंकडेही महत्वाची धुरा!

Municipal Election In-Charges : सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पंढरपूरसाठी प्रणव परिचारक, मोहोळसाठी सुशील क्षीरसागर, अकलूजसाठी अनंत राऊत, अनगरसाठी बाळराजे पाटील प्रभारी नेमले आहेत.
Municipal Election
Municipal ElectionSarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून सर्व ठिकाणी स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे.

  2. भाजपने प्रत्येक ठिकाणासाठी स्थानिक निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे, ज्यात बहुतेक प्रभारी संघ परिवारातून तयार झालेले कार्यकर्ते आहेत.

  3. अकलूजसाठी अनंत राऊत, मोहोळसाठी सुशील क्षीरसागर, पंढरपूरसाठी प्रणव परिचारक, आणि अनगरसाठी विक्रांत (बाळराजे) पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

Solapur, 07 November : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली असून या ठिकाणी स्वबळावर सत्ता आणण्याचा चंग पक्षाने बांधला आहे. त्यादृष्टीने गुरुवारी (ता. 06 नोव्हेंबर) जिल्हा निवडणूक प्रभारींच्या नियुक्ता जाहीर केल्यानंतर आज नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी स्थानिक पातळीवर प्रभारी नेमण्यात आले आहेत. यामध्ये पंढरपूरसाठी प्रणव परिचारक, मोहोळसाठी सुशील क्षीरसागर, मोहिते पाटलांच्या बालेकिल्ला असलेल्या अकलूजसाठी संघ परिवारातील अनंत राऊत, तर अनगर नगरपंचायतीसाठी विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सोलापूर (Solapur)जिल्ह्यात अक्कलकोट, अकलूज, बार्शी, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या अकरा नगरपालिका आणि अनगर या नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. नगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपकडून संघटनात्मकदृष्ट्या व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे

नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने (BJP)गुरुवारी जिल्हा निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली आहे. त्यानंतर आज स्थानिक पातळीवर प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. या प्रभारींची नियुक्ती करतना भाजपने पक्षातील निष्ठावंतांवरच ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या अकलूज नगरपरिषेदेचे प्रभारी म्हणून संघ स्वयंसेवक असलेले अनंत राऊत यांची नियुक्ती केली आहे. राऊत यांची नियुक्ती करून भाजपने मोहिते पाटील यांना वगळून निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

अकलूजप्रमाणेच मोहोळची जबाबदारीही भाजपशी एकनिष्ठ राहिलेले सुशील क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वास्तविक मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, भाजपने मोहोळमध्ये राजन पाटील समर्थकाच्या ऐवजी मूळ भाजपचे असलेले सुशील क्षीरसागर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Municipal Election
Karad Nagar Parishad : भाजपचा वारू रोखण्यासाठी कराडमध्ये वेगळाच प्लॅन शिजतोय; राष्ट्रवादी अन् शिवसेनाही देणार साथ?

विशेष म्हणजे विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील वगळता इतर सर्व प्रभारी हे संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत, त्यामुळे भाजपने निवडणूक रणनीती आखण्याची जबाबदारी संघ स्वयंसवेकांच्या खांद्यावर असणार आहे. या कार्यकर्त्यांच्या जोरावरच भाजपने शतप्रतिशत यश मिळविण्याचे ठरविल्याचे दिसून येते. त्यातूनच सोलापूरच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे.

नगरपालिका ......................निवडणूक प्रभारी

अक्कलकोट.................... शिवशरण जोजन

अकलूज....................... अनंत राऊत

बार्शी........................... रवी माळवे

दुधनी......................... प्रदीप पाटील

करमाळा..................... शशिकांत कल्याणी

कुर्डूवाडी.................... विजय बाबर

मैंदर्गी........................ प्रदीप मल्लिनाथ पाटील

Municipal Election
NCP Election Strategy Meeting : राष्ट्रवादीच्या निवडणूक स्ट्रॅटेजी मिटिंगला रामराजेंची दांडी; मकरंद पाटलांच्या हाती साताऱ्याचे स्टेअरिंग!

मंगळवेढा.................... राजेंद्र सुरवसे

मोहोळ..................... सुशील क्षीरसागर

पंढरपूर................... प्रणव परिचारक

सांगोला................... संभाजी वरपे

नगरपंचायत

अनगर....................... विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील

Q1. सोलापूर जिल्ह्यात किती ठिकाणी निवडणुका होणार आहेत?
A1. ११ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत.

Q2. अकलूज नगरपरिषदेचा प्रभारी कोण आहे?
A2. अकलूजसाठी अनंत राऊत यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Q3. भाजपने निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे?
A3. भाजपने या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Q4. मोहोळ नगरपरिषदेचा प्रभारी कोण आहे?
A4. मोहोळसाठी सुशील क्षीरसागर यांना प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com