Vijay Wadettiwar : फडणवीस सरकारला शिंगावर घेणारा काँग्रेसचा आक्रमक नेता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर; थेट नोटीसच धाडली...

Vijay Wadettiwar IT Notice : मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शिवाय त्यांनी नागपुरात ओबीसींच्या मेळाव्याची घोषणा देखील केली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli News, 29 Oct : मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शिवाय त्यांनी नागपुरात ओबीसींच्या मेळाव्याची घोषणा देखील केली आहे.

अशातच आता त्यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. तर ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नागपुरात मोठ्या मेळाव्याची घोषणा केल्यानंतर लगेच आली. त्यामुळे लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकारने आपल्याला नोटीस बजावली असून राजकीय सूडबुद्धीतन ही कारवाई केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नागपुरात मोठ्या मेळाव्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आयकर नोटीस बजावण्यात आली, लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सींचा गैरवापर करत आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Wadettiwar
BMC Election 2025 : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरे भाकरी फिरवणार, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी 'या' नगरसेवकांचा पत्ता कट करणार

सोमवारी गडचिरोली येथील एका काँग्रेस कार्यक्रमात आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीस संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 'ही नोटीस म्हणजे ओबीसी आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी उभे राहणाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही. शेतकरी, आदिवासी आणि कामगारांच्या न्यायासाठी लढत राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Vijay Wadettiwar
BJP office land transfer dispute : भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागेचा वाद, हस्तांतरणात नियम अन् अटीचा भंग; रोहित पवारांची चौकशी मागणी

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेनेतील अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हे पक्षांतर राजकीय समीकरणे बदलणारा क्षण आहे.

राजकीय फायद्यासाठी लोकांना विभागण्याचा प्रयत्न सुरू सरकारकडून आहे; पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील आमचा लढा हा भारताच्या विविधतेत एकतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com