

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारीसाठी 350 पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज केले आहेत.
निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.
जागावाटपात भाजपच मोठा भाऊ राहील आणि उमेदवारीवरून बंडखोरी होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Kolhapur News : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या दोन दिवसात 350 पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता असणार्या उमेदवारालाच पक्षाच्या वतीने संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उमेदवारीवरून पक्षांमध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही किंवा नाराजी राहणार नाही, असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गेले दोन दिवस खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी घेतल्या. आज या मुलाखतीच्या दरम्यान खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यामध्ये पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणार्यांची संख्या पाहून आपण भारावून गेलो असून त्यातून भाजपबद्दल जनतेमध्ये असणारा विश्वास व्यक्त होत असल्याचे महाडिक यांनी नमूद केले. तसेच निवडून येण्याची क्षमता असणार्या उमेदवारालाच संधी दिली जाईल. मात्र त्यातून अन्य उमेदवारांमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी निर्माण होणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी तसेच त्याच्या विजयासाठी सर्वजण झोकून देऊन काम करतील, असेही महाडिक यांनी सांगितले. सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोअर कमिटीकडे पाठवला जाईल. त्यानंतर चार-पाच दिवसात उमेदवारी संबंधित चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले असून काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडीकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यताही सांगितली आहे.
मावळत्या सभागृहातील काँग्रेसच्या पूर्वीच्या जागांवर महायुती दावा करणार आहे. काँग्रेसच्या या जागांचे महायुती मधील घटक पक्षांमध्ये समान वाटप होईल. महायुती मधील जागा वाटपाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही महाडिक यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर महापालिकेत 15 वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती. मात्र कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही. उलट महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाने गती घेतलीय. रखडलेले प्रकल्प मार्गी लागल्याचा दावा महाडिक यांनी केला आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूकीतील जागा वाटपांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत, उमेदवारी देताना समतोल साधला जाईल. तसेच निवडणुकीत तरुण युवकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे 25 ते 30 टक्के जागावर युवा पिढीला संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
1. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी किती इच्छुक उमेदवार आहेत?
➡️ गेल्या दोन दिवसांत 350 पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
2. भाजप उमेदवार निवडताना कोणता निकष लावणार आहे?
➡️ निवडून येण्याची क्षमता (winnability) हा मुख्य निकष असणार आहे.
3. उमेदवारीवरून बंडखोरी होण्याची शक्यता आहे का?
➡️ नाही, कोणतीही बंडखोरी किंवा नाराजी होणार नाही, असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
4. जागावाटपात भाजपची भूमिका काय असेल?
➡️ जागावाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
5. भाजपकडून उमेदवारीची अंतिम यादी कधी जाहीर होऊ शकते?
➡️ मुलाखती पूर्ण झाल्यानंतर लवकरच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.