Kolhapur Municipal Corporation
डिसेंबर 1972 मध्ये कोल्हापूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाले. तेव्हापासून या महापालिकेमध्ये काँग्रेस, काँग्रेस विचारी पक्ष आणि डाव्यांचे वर्चस्वराहिले आहे. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. सध्या महानगरपालिकेतून 81 नगरसेवक निवडून येत असतात. तसेच 4 स्वीकृत नगरसेवक सभागृहात असतात.