Karad News : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र तथा कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी अपमानजनक विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कऱ्हाड दक्षिण शाखेच्या वतीने प्रियांक खर्गे यांच्या निषेधार्थ मलकापूर येथे जोरदार निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे खर्गे यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (BJP is aggressive about insulting Veer Savarkar)
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असा प्रश्न कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी उपस्थित केला होता. प्रियांक खर्गे यांनी असे विधान करून संपूर्ण देशभक्तांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही, असेही भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार राहुल गांधी हे पूर्वी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावर टीका करत होते. आता प्रियांक खर्गे हेही सावरकरांवर बोलत आहेत. मात्र, सावरकरांचा अपमान या देशातील जनता कदापि सहन करणार नाही. सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला सर्वसामान्य जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही धनंजय पाटील यांनी दिला.
मलकापूर येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी काँग्रेस आणि खर्गे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कापीलचे माजी सरपंच मोहनराव जाधव, पंकज पाटील, धनाजी माने, नंदकुमार जाधव, बाळासाहेब पवार, प्रदीप जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.