Pandharpur News: माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालांनी राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहे.एकीकडे लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर महायुतीत खटक्यावर खटके उडत असतानाच आता पंढरपूरमध्येही अशीच राजकीय तानातानी पाहायला मिळाली. आरोग्यमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली.
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या 200 बेड विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन सोमवारी (ता.24) आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमावर भाजप आमदार समाधान आवताडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. यामुळे पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात नवा पेटण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि पंढरपूरचे भाजप (BJP) आमदार समाधान आवताडे यांच्यासह माजी आमदारांची निमंत्रण पत्रिकेत नावेही छापण्यात आली होती.परंतु,आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा कार्यक्रम भाजपचे आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक व इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ठरविण्यात आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर करण्यात आला आहे.
महायुती सरकारमधील मंत्री तानाजी सावंत आणि भाजप आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.या नेत्यांमधील नाराजीनाट्य एकमेकांचा निषेध नोंदवण्यापर्यंत पोहचले. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आमदार समाधान आवताडे यांच्यासह माजी आमदार प्रशांत परिचारक आणि जिल्ह्यातील इतर नेतेमंडळींनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रम सुरु असतानाच आरोग्य विभागाने भाजपच्या आजी-माजी आमदारांना विश्वासात न घेता कार्यक्रम ठरविल्याचा थेट आरोप केला. ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीमध्ये विस्तारीकरणाच्या कामात भाजपच्या आजी माजी आमदारांचा मोठा वाटा आहे. असे असतानाही त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रम घेतला आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पत्रिकेत नाव टाकले नाही. त्यांचा तो अपमान असल्याची टीका त्यांनी केली.
यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, पत्रिका छापण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडे असते, प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी पत्रिका छापली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघातील हा कार्यक्रम आहे. त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे होते. लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास याला जर कोणी नख लावण्याचा काम करत असेल तर त्याचाही मी याच व्यासपीठावरुन सर्वांच्या साक्षीने निषेध करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.