Chandrakant Patil : आयोगाआधीच चंद्रकांतदादांनी निवडणुकीचं वेळापत्रक फोडलं : कधी, कोणती निवडणूक? आचारसंहिता कधी? सगळंच सांगितलं

Chandrakant Patil On local body election schedule : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी अद्याप त्या कधी होणार हे अद्याप कोणालाच सांगता आलेलं नाही.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. चंद्रकांत पाटील यांनी तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

  2. दिवाळीनंतर पहिली निवडणूक जिल्हा परिषदेची होईल, तर डिसेंबरच्या शेवटी नगरपालिकांची निवडणूक लागेल.

  3. पाटील म्हणाले की, खरी निवडणूक लोकसभा किंवा विधानसभा नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेची असते.

Kolhapur News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेल्या तीन एक वर्षांपासूनन रखडल्या आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिकांसह सर्वच स्थानिक संस्थांवर प्रशासक राज्य सुरू आहे. त्यामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिकच्या निवडणूका कधी होणार अशी विचारणा होत होती. अशातच सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र त्याकधी होणार त्याबद्दल कोणालाच भाष्य करता आलेलं नाही. पण आता त्या लवकरच होतील अशी ग्वाही भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी फक्त लवकरच असे न सांगता त्या निवडणूका कधी होतील याचे वेळापत्रकही सांगितले आहे. यामुळे आता इच्छुकांसह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी, लोकसभा, विधानसभा निवडणुकी पेक्षा खरी निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते, असे सांगितले आहे. तसेच दिवाळीनंतर पहिली निवडणूक ही जिल्हा परिषदेची होईल असे सांगताना ती नोव्हेंबरच्या शेवटी तर डिसेंबरच्या शेवटी नगरपालिकांची निवडणूक लागेल असेही ते म्हणाले. याचबरोबर प्रतिक्षा असणाऱ्या महापालिका निवडणूक या जानेवारी महिन्याच्या शेवटीला होईल असा दावा त्यांनी केला आहे. तसेच पाटील यांनी, निवडणूकांचा कार्यक्रम सांगताना, आचारसंहिताही कधी लागेल याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, असा दावा करताना त्यांनी राजकीय नेत्यांना विकासकामांचे उद्घाटन आटपून घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यांच्या या सूचना एकाप्रकारे इच्छुकांसाठी निवडणुकीची तारीखच जाहीर केल्या प्रमाणे आहे. त्यामुळे आता बाशिंग बांधलेल्या इच्छुकांच्या प्रत्यक्ष तयारीला आणि राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil News: चंद्रकांतदादांनी थेट 'डीसीपीं'ना फोन लावताच तपासाची सूत्रं वेगानं फिरली,गौतमी पाटीलला अखेर पोलिसांचा दणका

यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचा चिमटाही काढताना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी निवडणूकांचा कार्यक्रम आपण सांगितला म्हणजे आता काहीजण म्हणतील माझा निवडणूक आयोगावर कंट्रोल आहे. पण तसे काही नसून आपण गेली 40 वर्षे राजकारणात आहोत. त्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.

निवडणुकीच्या तयारीला लागूया

एकीकडे चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत असतानाच राजकीय नेत्यांना विकासकामांचे उद्घाटन आटपून घ्या, असे आदेश दिले आहेत. यावेळी त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुकांना देखील महत्वाचा संदेश दिला आहे. त्यांनी आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया असे म्हणताना, 2019 ला ज्यांचे तिकीट नाकारले ते बावनकुळे यांना 2024 चे उमेदवार निवडण्याचे अधिकारी मिळाले. त्यामुळे निवडणूक ही फास्ट ट्रेन सारखी असून फ्लॅटफॉर्मवर जो राहतो तो ट्रेनमध्ये बसेल. जो न नसेल तो मागे राहील. पण यामुळे नाराज होऊ नका असाही धीर चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

स्थानिक स्वराज्य एकत्र लढणार

यावेळी पाटील यांनी स्वबळ्याच्या नाराकडे न जाता थेट स्थानिक स्वराज्य एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं साथ दिली नाही. तर राजकारणात प्रयत्नासोबत नशीब असावे लागते, 2017 ची परिस्थिती बदला, दिवाळीचा उपयोग करून घ्या. लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधा. अगोदर जोडपी, नगरपालिका आटपून घ्या, आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात या. आपण महायुती म्हणून एकत्र लढायचे आहे. जर शेवटच्या क्षणी काही निर्णय घ्यायचे असतील तर वरिष्ठ घेतील. पण आपण लोकसभा, विधानसभा एकत्र लढलो असेल तर स्थानिक स्वराज्य एकत्र लढणार आहोत. एकही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशीही ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे.

मैत्रीपूर्ण लढत होईल

आगामी स्थानिकच्या निवडणुकीतही महायुती आणि महाविकास आघाडीत मोठा फरक असला पाहिजे. आता तर जिल्ह्यात दहा आमदार महायुतीचे आहे. त्यामुळे निवडणुकीकडे लक्ष द्या. असे करताना कार्यकर्ता महत्वाचा आहे. निवडणुका होतील जातील पण कार्यकर्ता राहिला पाहिजे. त्यासाठी आता कार्यकर्त्यांची वेळ आली आहे. आम्ही त्याच्यासोबत आहोत. राष्ट्रवादी आणि शिवसेना जिथं आग्रही असेल तेथे एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही संकेत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले आहेत.

Chandrakant Patil
‘फक्त 5 घोटाळे बाहेर काढा, पळून जातील’ चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना इशारा, Chandrakant Patil

FAQs :

प्र.१: चंद्रकांत पाटील यांनी कोणती घोषणा केली आहे?
उ: त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

प्र.२: पहिली निवडणूक कोणती होणार आहे?
उ: दिवाळीनंतर जिल्हा परिषद निवडणूक होईल.

प्र.३: नगरपालिकांच्या निवडणुका कधी होतील?
उ: डिसेंबरच्या शेवटी नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

प्र.४: या निवडणुका किती काळ रखडल्या होत्या?
उ: या निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या होत्या.

प्र.५: चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकांबद्दल काय विधान केले?
उ: त्यांनी म्हटलं की खरी निवडणूक लोकसभा किंवा विधानसभा नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेची असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com