Chandrakant Patil News: चंद्रकांतदादांनी थेट 'डीसीपीं'ना फोन लावताच तपासाची सूत्रं वेगानं फिरली,गौतमी पाटीलला अखेर पोलिसांचा दणका

Gautami Patil News: पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीच्या चालकाने अपघात केला. या अपघातात जखमी ऑटो रिक्षाचालक रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशावेळी गौतमी पाटीलला सिंहगड पोलिसांनी 30 तारखेला चौकशीसाठी बोलावले असता ती शो करत महाराष्ट्रात फिरत असल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला होता.
Chandrakant Patil Gautami Patil .jpg
Chandrakant Patil Gautami Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी(ता.30 सप्टेंबर) पहाटे घडला होता. या अपघातप्रकरणी महाराष्ट्राची प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी केली आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाने रिक्षाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. पण या अपघातानंतर नुकसानभरपाई तर सोडाच,साधा चौकशीचा मेसेजही न केल्याचा आरोप रिक्षाचालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी केला होता. तसेच पोलिसही सहकार्य करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. पण याप्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट डीसीपी संभाजी पाटील यांनाच फोन लावल्यानंतर सूत्रे वेगानं फिरली असून पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे.

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारनं रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी आता हे वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्याने पुणे पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या अपघात प्रकरणी चौकशीसाठी हजर राहावे, असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कारमुळे झालेल्या अपघातप्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे आक्रमक झाले. त्यांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव सामाजी विठ्ठल मरगळे असे आहे.अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली.त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मरगळे कुटुंबियांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन मदतीची मागणी केली होती. त्यावर पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा,असे निर्देश दिले.

Chandrakant Patil Gautami Patil .jpg
Maharashtra Elections: तयारीला लागा..! नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाबाबत 'ही' मोठी अपडेट, दिवाळीनंतर 'स्थानिक'च्या निवडणुकांचा धुरळा उडणार?

पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनसमोर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गौतमी पाटील विरोधात आंदोलन केलं. तिचे राज्यातील शो बंद करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाचा हे ठिय्या आंदोलन केलं होतं.

पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीच्या चालकाने अपघात केला. या अपघातात जखमी ऑटो रिक्षाचालक रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशावेळी गौतमी पाटीलला सिंहगड पोलिसांनी 30 तारखेला चौकशीसाठी बोलावले असता ती शो करत महाराष्ट्रात फिरत असल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com