Assembly Election 2024 : भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलानं अन् मुलीनं 'तुतारी'कडून उमेदवारीसाठी लावली 'फिल्डींग'

Sharad Pawar : सोलापूर जिल्ह्यात सध्या शरद पवार यांच्या 'तुतारी'चं वारे वाहत आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे.
sharad pawar | devendra fadnavis
sharad pawar | devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

माजी मंत्री, लक्ष्मण ढोबळे हे राष्ट्रवादीतून भाजपवासी झाले आहेत. मात्र, ढोबळे यांची कन्या आणि पुत्राचा ओढा पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याचं दिसून आलं आहे. ढोबळे यांचे पुत्र अभिजित आणि कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांनी 'तुतारी'कडून उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे भाजपला सोलापूर जिल्ह्यात '440 व्होल्ट'चा झटका बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या सहकार्यानं लक्ष्मण ढोबळे यांनी राजकारणात मोठी मजल मारली. त्यांनी आपल्या लाघवी वाणीनं संपूर्ण महाराष्ट्राला मोहिनी घातली. 2004 पर्यंत लक्ष्मण ढोबळे मंगळवेढ्याचे आमदार होते. परंतु, 2004 ते 2009 या काळात विश्रांती घेत 2009 पासून पुन्हा मोहोळमधून राष्ट्रवादीचे आमदार होण्याची किमया ढोबळे यांना शरद पवार यांच्यामुळे साधला आली होती. मात्र, 2014 मध्ये डावलल्यानंतर ढोबळे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेत अपक्ष लढण्याची भूमिका घेतली, त्यात त्यांचा पराभव झाला.

पराभवानंतर ढोबळे ( Laxman Dhobale ) यांनी भाजपशी जवळीक साधली. काही दिवस भाजपत काम केल्यानंतर ढोबळे यांच्या गळ्यात प्रवक्तेपदाची माळ पडली. सध्यातरी लक्ष्मण ढोबळे हे एकनिष्ठपणे भाजपचे काम करत आहेत. मात्र, ढोबळे यांचे पुत्र अभिजित यांनी मोहोळ तर कन्या कोमल यांनी माळशिरस मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळण्यासाठी मुलाखत दिली आहे.

sharad pawar | devendra fadnavis
Dharmraj Kadadi : लोकसभेला काँग्रेसचा प्रचार करणारे धर्मराज काडादी 'तुतारी' हाती घेणार?

अभिजित ढोबळे हे शाहू सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. त्यासह अभिजित यांच्याकडे भाजपच्या पंचायतराज आणि ग्रामविकास विभागाचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संयोजकपद आहे. तर, लक्ष्मण ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषद संघटनेची जबाबदारी कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांच्यावर सोपावली असून त्यामाध्यमातून त्या सामाजिक कार्य करतात.

sharad pawar | devendra fadnavis
Sharad Pawar: शरद पवारांचा एकच प्रश्न; इच्छुकांची फिरकी; मुलाखतीत काय विचारलं?

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आले आहेत. मात्र, विधानसभेसठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांची भाऊक गर्दी झाली आहे. यातच भाजपत असलेल्या लक्ष्मण ढोबळे यांच्या पुत्रानं आणि कन्येनं 'तुतारी'च्या तिकीटासाठी मुलाखत दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com