Sugar Factory : अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर आज जाहीर झाला. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीच्या या निकालात माजी मंत्री व भाजप नेते मधुकरराव पिचड (Madhukar Pichad) आणि माजी आमदार वैभव पिचड यांचा पराभव झाला. आधी आमदारकी नंतर ग्रामपंचायत आणि आता कारखान्यातही पिचड यांना धक्का बसल्यामुळे पराभवाची मोठी चर्चा होत आहे.
इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गटातून शेतकरी विकास मंडळचे उमेदवार वैभव पिचड तसेच कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालक भाऊसाहेब खरात व अपक्ष उमेदवार प्रकाश हासे यांचा पराभव झाला. तर शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार आणि विद्यमान संचालक अशोक देशमुख, पाटीलबा सावंत, खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप हासे यांचा विजय झाला.
कारखान्याच्या निवडणुकीत 5 गटातील 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात होते. यासाठी रविवारी चुरशीचे मतदान झाले होते. यावेळी 8 हजार 392 मतदारांपैकी 7 हजार 116 म्हणजे जवळपास 87.39 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याच निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे.
या निवडणुकीत मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे, कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात लढत झाली.
कोतुळ गट :
१) घुले सुभाष बाबुराव ( अपक्ष) ८५
२) देशमुख मनोज शिवनाथ ( समृद्धी)४३०६
३) देशमुख राजेंद्र नानासाहेब ( विकास)२६४५
४) लहामटे यमाजी सखाराम ( समृद्धी)४४६५
५)शेळके कैलास सीताराम ( समृद्धी) ४३५३
६) शेळके रावसाहेब तुकाराम ( विकास)२४६३
७) सावंत बाळासाहेब गणपत ( विकास)२४२३
आगर गट :
१) आरोटे अशोक झुंबरराव ( समृद्धी)४४१४
२) आरोटे सुधाकर काशिनाथ ( विकास)२७११
३) कोटकर सुनिल सुकदेव ( विकास)२३९२
४) नाईकवाडी परबत नामदेव ( समृद्धी)४४१४
५) फोडसे संपत कारभारी (अपक्ष)१७३
६) शेटे किसन रावजी ( विकास)२५२८
७) शेटे विकास कचरु ( समृद्धी)४१३८
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.