Satara Politics : उदयनराजेंचा नादच नाय...; थेट 2019 च्या लोकसभेतील विरोधकाचं घरच गाठलं

Chhatrapati Udayanraje Bhonsle : 2019 ला सातारा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील आणि उदयनराजे भोसले एकमेकांविरोधात लढले होते.
Chhatrapati Udayanraje Bhonsle
Chhatrapati Udayanraje BhonsleSarkarnama
Published on
Updated on

Satara News : गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सातारा लोकसभेला छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधातील उमेदवार असलेले माथाडी कामगारनेते नरेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार उदयनराजे ढेबेवाडी खोऱ्यातील मंद्रुळकोळे येथील घरीच पोहोचले.

या अचानक घडलेल्या भेटीमुळे नरेंद्र पाटलांना सुखद धक्का बसला. 2019 मध्ये सातारा लोकसभा निवडणुकीत माजी आमदार नरेंद्र पाटील शिवसेना-भाजप युतीचे तर उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुकीला एकमेकांविरोधात लढले.

त्यानंतर आज वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. आता दोन्ही नेते भाजपात असल्याने जुन्या आठवणीत दोघेही रमलेले पाहायला मिळाले. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. प्राची पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, विक्रमबाबा पाटणकर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhatrapati Udayanraje Bhonsle
Sambhajiraje News : संभाजीराजेंच्या खासदारकीचा मार्ग खडतर; राज्यसभेला जी अडचण झाली, तीच लोकसभेला?

माथाडीनेते नरेंद्र पाटील 2019 पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. परंतु, सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटलेला असल्याने निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र पाटलांनी भाजपाला काही काळापुरता रामराम केला. शिवसेनेतून त्यांनी उदयनराजेंच्या विरोधात शड्डू ठोकून तब्बल 4 लाख 52 हजार 498 मते मिळवली होती.

या निवडणुकीत नरेंद्र पाटलांचा पराभव झाला असला तरी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना चांगलेच हेरले. नरेंद्र पाटील यांच्याविरोधात उदयनराजेंनी 5 लाख 79 हजार 26 मते मिळवत विजय मिळवला होता. या घडामोडींनंतर 2019 निवडणुकीतील पराभूत उमदेवार नरेंद्र पाटील आणि विजयी उमेदवार उदयनराजे दोघेही भाजपात गेले.   

उदयनराजेंची कामाची स्टाईल बदलली

उदयनराजे भोसले हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या महिन्यात ते दिल्लीवारीवर गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये बदल करीत कामाला अधिक गतीने सुरुवात केली आहे. त्यांच्या या स्टाईलवरून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असाच अंदाज राजकीय जाणकारांकडून लावला जात आहे.

कारण भाजपाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणे, कार्यक्रमाची आखणी करणे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाची ध्येयधोरणे स्वतः हून लोकांना सांगणे. या गोष्टीवर भर दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर साताऱ्यात नगरपालिकेच्या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजेंसोबत एकत्रित बसणे, फलटणच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर अचानक माजी विधानसभाध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट देणे.

त्याच पद्धतीने गेल्या पंचवार्षिकला विरोधात लढलेले उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त थेट ढेबेवाडी खोऱ्यात घरी जाऊन शुभेच्छा देत चर्चा करणे. यामुळे महाराजांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे, असेच म्हटले जाऊ लागले आहे. 

उदयनराजेंचा दिलदारपणा

उदयनराजे यांचा दिलदारपणा अनेकांनी पाहायला आहे. 2019 मध्ये नरेंद्र पाटील शिवसेनेकडून उमेदवार असताना आणि निवडणुकीची धामधूम सुरू असताना नरेंद्र पाटील यांची आई वत्सलाताई या आजारी होत्या. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 2019 चे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी थेट हॉस्पिटल गाठले. तेव्हा नरेंद्र पाटलांच्या आईच्या प्रकृतीची चौकशी केली होती. निवडणुकीनंतर नरेंद्र पाटील आणि उदयनराजे एकत्रित आले आहेत. कधी दोघांनी एकत्रित गाडीतून प्रवास केला.

(Edited By : Ganesh Thombare)

R...

Chhatrapati Udayanraje Bhonsle
MLA Anil Babar: 'आटपाडीतील राजकारण विचित्र, मला...'; आमदार बाबरांनी भरकार्यक्रमात बोलून दाखवली नाराजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com