Krishna River Pollution Sangli News :
कृष्णा नदीच्या प्रदूषणास साखर कारखाने, दूध डेअरी, एमआयडीसी कारणीभूत आहेत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या माध्यमातून सामान्य जनतेला दंड ठोठावला आहे. राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पामध्ये कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी भरीव तरतूद करावी. प्रदूषणमुक्तीसाठी तरतूद न झाल्यास कराडच्या प्रीती संगमापासून आंदोलन सुरू केले जाईल. ते आंदोलन पुढे मंत्रालयापर्यंत धडकेल, असा इशारा Bjp किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी दिला.
नदीच्या प्रदूषणाकडे शासकीय यंत्रणा अत्यंत क्रूरपणे पाहत आहेत. कुपवाड व मिरज एमआयडीसीमध्ये उद्योगांचा संयुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद अवस्थेत आहे. या प्रकल्पाची जबाबदारी ना उद्योजक घेताहेत, ना एमआडीसी प्रशासन. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याबाबत हात वर केले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी नाल्याच्या माध्यमातून पुढे नदीत मिसळत आहे. ( Sangli Politics News )
नागरिकांच्या सांडपाण्यापेक्षा साखर कारखाने तसेच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार असणार्या घटकांवर व त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार्या जबाबदार शासकीय यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी. महापालिकेचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच एमआयडीसी प्रशासन यास जबाबदार आहेत. संबंधित अधिकार्यांच्या पगारातून दंडाची वसुली केली जावी, अशी मागणी आम्ही याचिकेतून करणार आहोत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कृष्णाचे प्रदूषण रोखणे काळाची गरज बनली आहे. राज्य सरकारने येथे काही दिवसांत मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कृष्णेच्या प्रदूषणमुक्तीसाठी भरीव तरतूद करावी जर सरकारने कृष्णा प्रदूषणमुक्तीसाठी निधी दिला नाही, तर कराडच्या प्रतीसंगमापासून आंदोलन सुरू करू त्यानंतर मंत्रालयावर धडक मारली जाईल. त्याबाबत कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी लवकरच व्यापक मोहीम उभारली जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून वारणा उद्भव योजनेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कृष्णेचे पाणी दूषित करून चांदोली येथील प्यायला पाणी द्या असे म्हणणेच चुकीचे आहे. कृष्णा नदीकाठी आपण राहात असतानाही प्रदूषणाची समस्या सोडून आपण वारणा नदी किंवा धरणातून पाणी आणण्यासाठी सरसावलो आहोत. आपल्या नदीची साथ सोडणे ही शोकांतिका असल्याचे पवार यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.