Manohar Bhosale Crime: भाजप नेत्याचा मनोहरमामाशी संबंध उघड : जादूटोण्याचा पैसा शिक्षण संस्थेत गुंतवायचा, दोघांना अटक

Karmala Political News: भारतीय जनता पक्षाचे करमाळ्यातील नेते प्रा. रामदास झोळ आणि भोंदू मनोहरमामा भोसले यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या माध्यमातून फसवणूक करून मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट भोसले हा प्रा. झोळ यांच्या संस्थेत गुंतवणूक करुन लावत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
Manohar Bhosale bjp Leader
Manohar Bhosale bjp Leader Sarkarnama
Published on
Updated on

Karmala News : भारतीय जनता पक्षाचे करमाळ्यातील नेते प्रा. रामदास झोळ आणि भोंदू मनोहरमामा भोसले यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. अनिष्ट आणि अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या माध्यमातून फसवणूक करून मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट भोसले हा प्रा. झोळ यांच्या संस्थेत गुंतवणूक करुन लावत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी प्रा. झोळ यांच्या दत्तकला इन्स्टिट्यूटशी संबंधित दोघांना कुर्डूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांना १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २३ एप्रिल २०२६ रोजी दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोहरमामा चंद्रकांत भोसले व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासासाठी सोलापूर ग्रामीण घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष एसआयटी पथक स्थापन केले आहे. या पथकाने आतापर्यंत २३ आरोपी निष्पन्न करून १० आरोपींना अटक केली आहे.

Manohar Bhosale bjp Leader
Priyank Kharge RSS : RSSवर बंदी कशी घालणार? ते नोंदणीकृतच नाहीत; प्रियांक खर्गेंचा संघाला जिव्हारी लागेल असा घाव

पोलिसांच्या तपासानुसार, मुख्य आरोपी मनोहरमामा भोसले हा अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोण्याच्या माध्यमातून अनेक पिढ्यांची फसवणूक करून मिळालेल्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट दत्तकला इन्स्टिट्यूट (शिक्षण संस्था), स्वामी चिंचोली, दौंड, पुणे येथील संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांच्या माध्यमातून लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात रामदास झोळ यांच्यासह त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये संबंधित आरोपींना मदत करणाऱ्या इतर साथीदारांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी राजेंद्र गोकुळ हुंबे व लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना अटक करण्यात आली आहे.

Manohar Bhosale bjp Leader
Sonia Gandhi : ‘सोनिया गांधींनी वंदे मातरम् थांबवायला लावले?, राहुल गांधींना इशारा नेमका कशासाठी?' भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचं पहिलं स्पष्टीकरण

तपासादरम्यान दत्तकला इन्स्टिट्यूटमधील याप्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी असलेले रजिस्टर, संगणक व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार राहुल गड तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com