Manohar Bhosale : मनोहरमामाचा 35 वर्षीय महिलेवर किडनीचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने बलात्कार

Karmala Crime News : तुरुंगात असलेल्या मनोहरमामा भोसले याच्यासह तिघांविरोधात महिलेवरील कथित अत्याचार, फसवणूक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये नवीन गुन्हा दाखल झाला आहे.
Manohar Bhosale
Manohar BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 July : अनेक गुन्ह्यात तुरुंगात असलेला मनोहरमामा भोसले याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एक महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोसले याच्यासह तिघांवर बलात्कार, फसवणूक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे भोसलेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

सध्या भोंदू मनोहरमामा भोसले हा तुरुंगात आहे. त्याच्यावर करमाळा व कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फसवणूक, बलात्कार, बुवाबाजी याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मनोहर भोसले याच्या विरोधात महिनाभरात बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या पतीला किडनीचा आजार होता, त्यामुळे उपचारासाठी संबंधित महिला रुग्णाला घेऊन मनोहरमामा भोसले याच्या मठात गेली होती. स्वतःला बाळूमामांचा अवतार मानणाऱ्या मनोहर भोसले याने संबंधितांना आजार बरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पूजा करायची म्हणून पहिल्यांदा ११ हजार रुपये घेतले होते.

त्यानंतर पुढील प्रत्येक अमावस्येला विशेष पूजा घालण्याच्या नावाखाली ५१ हजार रुपये घेतले. असे मनोहर भोसले याने त्या महिलेकडून एकूण ९ लाख ६८ हजार रुपये उकळल्याचा आरोप महिलेने फिर्यादीत नमूद केलेला आहे.

Manohar Bhosale
Mohite Patil : अनेक वर्षे उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार राहिलेल्या मोहिते पाटलांच्या अकलूजला टॅंकरने पाणीपुरवठा; टंचाई नैसर्गिक की राजकीय?

एका अमावस्येला संबंधित महिलेला पूजा घालायची आहे, असे सांगून मनोहर भोसले याने मठात थांबवून घेतले. पूजा, मंत्रतंत्राच्या नावाखाली संबंधित महिलेले भोसले याने गुंगीचे पाणी पाजले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ती शुद्धीवर आल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. पण, हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Manohar Bhosale
Eknath Shinde : ...म्हणून डॉक्टरांनी एकनाथ शिंदेंना विश्रांतीचा सल्ला दिलाय : शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचे केंद्रीय विस्ताराबाबतही भाष्य

या प्रकरणी मनोहर भोसले, नाथबाबा ऊर्फ विशाल शहाजी वाघमारे तसेच एका अनोळखी चालकाविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रणजीत माने तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com