मंडलिक, कुपेकरांना उतारवयात कुणी त्रास दिला? समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर निशाणा

भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे.
Samarjit Singh Ghatge and Virendra Mandlik
Samarjit Singh Ghatge and Virendra Mandlik Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्यात वाद सुरू आहे. यावरून घाटगेंनी पुन्हा एकदा मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे. विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक आणि बाबासाहेब कुपेकर ही जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारी मंडळी होती. मात्र कागल तालुक्यातील काहींनी उतारवयात त्यांना त्रास दिला. या ऋषितुल्य मंडळींना झालेल्या वेदना कशा विसरता येतील? असा सवाल करीत घाटगेंनी मुश्रीफांवर निशाणा साधला.

कागल तालुक्यातील एकोंडी विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. या वेळी अध्यक्षस्थानी मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक होते. या कार्यक्रमात बोलताना घाटगे म्हणाले की, कागलचे मंत्री स्वतःला वडाचे झाड म्हणत आहेत. मात्र, ते वडाचे झाड नाहीत. विक्रमसिंग घाटगे, सदाशिवराव मंडलिक आणि बाबासाहेब कुपेकर ही मंडळी वडाचे झाड होती. त्यांना विळखा घालून त्यांच्या आधाराने मोठे झालेले मंत्री हे जातीयवादी विषारी वेल आहेत. ती कापण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. हिंदूंची मते मिळविण्यासाठी वाढदिवसाला रामनवमीचा आधार घेऊन दिशाभूल करणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेच खरे जातीयवादी आहेत.

गोकुळमध्ये विश्वासघाताने माझा पराभव झाला. ही आमच्या गटाची भळभळती जखम आहे. समरजितसिंह घाटगे आणि आमची चांगली मैत्री आहे. एकत्र येण्याच्या दृष्टीने आमची काहीही बिनसलेले नाही. त्याची मुहूर्तमेढ आज रोवत आहोत, असे वीरेंद्र मंडलिक म्हणाले. या वेळी माजी उपसभापती विजय भोसले, शाहूचे संचालक प्रा.सुनिल मगदूम,आदर्श पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

Samarjit Singh Ghatge and Virendra Mandlik
बारा आमदारांचं काय होणार? राज्यपालांनी पाठवलेलं ते पत्रच निघालं बनावट

समरजित घाटगे यांनी समर्थकांसह काही दिवसांपूर्वी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. याला प्रत्युत्तर म्हणून मुश्रीफ समर्थकांनी नुकताच जोरदार मोर्चा काढला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागल शहरातील राम मंदिराला राजकीय अड्डा बनवले आहे. हसन मुश्रीफ यांची जन्मतारखेवरून त्यांनी बदनामी सुरु केली आहे, असा आरोप समर्थकांनी केला होता. घाटगे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत हसन मुश्रीफ समर्थकांनी कागल पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढला होता.

Samarjit Singh Ghatge and Virendra Mandlik
बारा आमदारांच्या नावावर फुली..राज्यपालांनी उलट मुख्यमंत्र्यांनाच दुसरी सहा नावं पाठवली?

दरम्यान, समरजित घाटगे यांनी मुश्रीफांवर आरोप केले होते. ते म्हणाले होते, प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा झालेला प्रकार निंदनीय आहे. तसेच रामनवमीला जन्माला आल्याचा मुश्रीफांचा दावाही खोटा आहे. त्यांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमी दिवशी झाला आहे. कारण विकिपीडिया वरती 24 मार्च 1954 ही तारीख आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला दिलेल्या कागदपत्रांमध्येही हीच जन्मतारीख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com