थकीत पगार मागणाऱ्या चालकास भाजप नेत्याने खासदारासमोरच धमकावले

हा सर्व प्रकार माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोरच घडला. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षदाच्या शर्यतीत असलेल्या या नेत्यावर नामुष्कीची वेळ आली.
Santosh Gurav-Santosh Patil
Santosh Gurav-Santosh PatilSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : तीन महिन्यांचा थकलेला पगार मागणाऱ्या चालकास भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने (BJP Leader) ढकलून देत धमकावले. ही घटना माढा तालुक्यातील मोडनिंब येथे घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singha Naik Nimbalkar) यांच्यासमोरच घडला. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षदाच्या शर्यतीत असलेल्या या नेत्यावर नामुष्कीची वेळ आली. (BJP leader threatened a driver who demanded unpaid salary)

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील मोडनिंब येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती. त्या वेळी स्थानिक नेते संतोष पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच संतोष पाटील यांच्याकडे चालक म्हणून काम केलेला संतोष गुरव हा तरुण त्या ठिकाणी आला. त्याने पाटील यांना तीन महिन्यांचा पगार देण्याची मागणी केली. त्यावेळी पाटील यांनी त्या तरुणास इकडे ये म्हणत गर्दीच्या बाहेर ढकलत नेत धमकावले.

Santosh Gurav-Santosh Patil
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; एकाच दिवशी १८ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा; शिंदे गटात सामील

तो चालक भाजप नेते संतोष पाटील यांना म्हणतोय की, ऐका की साहेब, मी माझा तीन महिन्यांचा पगार मागतोय, आपल्याला. असं का करताय साहेब. सहा महिन्यांपूर्वीही मी पगाराची मागणी केल्यानंतर असंच धमकावत मला मारलं होतं साहेब. असं का करताय साहेब. मी खासदार साहेबांनाच सांगतो, अशा पद्धतीने तो तरुण पगार मिळविण्यासाठी प्रयत्न करताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Santosh Gurav-Santosh Patil
मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याची सगळी तयारी झाली होती; पण...: फडणवीसांनी उघड केले पत्ते

या प्रकरामुळे भाजप नेते संतोष पाटील यांची खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोरच भर कार्यक्रमात फजिती झाली. ड्रायव्हर संतोष गुरव याने खासदार निंबाळकर यांच्यासमोर लोकांमध्ये पैसे मागितल्याने पाटील चांगलेच वैतागले होते. शेवटी त्यांनी पोलिसांना संतोष गुरव याला येथून घेऊन जा, अशी सूचना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com