मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याची सगळी तयारी झाली होती; पण...: फडणवीसांनी उघड केले पत्ते

मागच्या निवडणुकीवेळी आशिष शेलार अध्यक्ष असताना मुंबई महापालिकेत आपण ३५ वरून ८२ पर्यंत मोठी मजल मारली होती.
 Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : मागच्या निवडणुकीवेळी आशिष शेलार (Ashish Shelar) अध्यक्ष असताना मुंबई (mumbai) महापालिकेत आपण ३५ वरून ८२ पर्यंत मोठी मजल मारली होती. त्यावेळी आपण भाजपचा (BJP) महापौर (mayor) बनवू शकलो असतो. आमची पूर्ण तयारीही झाली होती. पण, आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पाऊले मागे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना महापौर बनवू दिला, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (All preparations were made to make BJP mayor in Mumbai : Devendra Fadnavis)

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी मागील निवडणुकीवेळी घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, आमदार आशिष शेलार यांनी मुंबई भाजपचं अध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काळ काम केले आहे. या वेळीही पक्षाने शेलार यांना मुंबईचं अध्यक्ष करण्याचे कारण काय आहे.? आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहेत. छत्रपतींच्या इतिहासामध्ये जेव्हा एखादी मोहिम असायाची. स्वराज्यासाठी ती अत्यंत महत्वाची असायची, तेव्हा शिवाजी महाराज हे बिन्नीचा शिलेदार निवडायचे. त्याला सांगायाचे की, तू जा आणि मोहिम फत्ते करून ये. त्याच पद्धतीने केंद्रीय भाजपने आपला बिन्नीचा शिलेदार आशिष शेलार यांना सांगितले आहे की, मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे, त्यामुळे तुम्ही मुंबईचं अध्यक्षपदा स्वीकारा.

 Devendra Fadnavis
'त्याच ठिकाणी १५ दिवसांत सभा घेणार; दम असेल तर केसाला धक्का लावून दाखवा'

मला विश्वास आहे की, मागच्या वेळी शेलार अध्यक्ष असताना मुंबई पालिकेत आपण मोठी मजल मारली होती. त्यावेळी आपण मित्रपक्षासाठी महापौरपद सोडले होते. पण, आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचाच महापौर बनेल. ती कुठली शिवसेना तर हिंदुह्‌दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना. ती शिवसेना आणि भाजप मिळून या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार आहोत, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

 Devendra Fadnavis
‘ठाकरेंना चार दिवस विनवणी केली, अखेर पाचव्या दिवशी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला’

उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का. तोच जल्लोष, उत्साह. पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे सर्वांनी बघितलं आहे. काल दहिहंडी जोरात, गणेशोत्सव जोरात, नवरात्री उत्सव, शिवजयंती, आंबडेकर जयंती सर्व काही जोरात करायचं आहे. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com