BJP Leader Arrested : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता अडचणीत; इचलकरंजीतून पोलिसांनी केली अटक

Extortion Case in Ichalkaranji News : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार माजी नगरसेवकासह या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. इचलकरंजी शहरातील एका सोनाराला बँकेच्या व्यवहार पूर्ण कर, नाही तर संपूर्ण परिवाराला मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली होती.

शहरातील भोनेमाळ परिसरातील असणाऱ्या भाजपच्या (BJP) कार्यालयामध्ये सोनाराला आणून धमकी दिली होती. या प्रकरणावर पोलीसाकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. पण सबंधित सोनाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

माजी नगरसेवक मनोज साळुंखे, माजी नगरसेवक बाजीराव कुंभार, शहानवाज मुजावर या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेना अटक केली आहे.

Crime News
Devendra Fadnavis : भुजबळ, मुनगंटीवारांच्या नावे विरोधकांना फडणवीसांनी का मारला टोला?

जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील एका सराफ व्यावसायिकाला बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत पाच लाखाची खंडणी मागण्याचा प्रकार इचलकरंजीत घडला. त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यासह आम्ही दोघांनी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

Crime News
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा अन् सीएम फडणवीस म्हणाले, '...नेहमीच असमाधानी असतो, कधीच समाधानी नसतो'

14 ते 18 मार्च दरम्यान सराफ व्यावसायिक पंकज दानवाडे याला माजी नगरसेवक मनोज साळुंखे, बाजीराव कुंभार, शहानवाज मुजावर यांनी राजर्षी शाहू महाराज पुतळा रिंग रोडवरील एका ऑफिसमध्ये बोलवून घेतले होते. यावेळी शहानवाज यांनी दानवाडे यांच्याकडे पैशाची मागणी करत मारहाण केली. पाच लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी देत मारहाण केली होती.

Crime News
Santosh Deshmukh Case : सीडीआरच्या डाटानुसार सुत्रधार वाल्मिक कराडच; उज्ज्वल निकम यांचा दावा

त्यामुळे घाबरलेल्या दानवाडे यांनी भीतीपोटी 50 हजार रुपये देऊन सुटका केली. अन्यथा कुटुंबाला ठार मारेल, अशी धमकी दिली असल्याची तक्रार दानवडे यांनी केली.या तक्रारीनंतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

साळुंखे यांच्यावर आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात सतरा गुन्हे नोंद आहेत. तर बाजीराव कुंभार आणि मुजावर यांच्यावर देखील गुन्हे असून ते सराईत गुन्हेगार आहेत. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखेना अटक केली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Crime News
Kunal Kamra : शिवसेनेच्या मंत्र्यांनं घेतली कुणाल कामराच्या संरक्षणाची ग्वाही; म्हणाले, 'त्याची मानसिक स्थिती...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com