Shivendraraje Bhosale : "जूननंतर कामांचा पाऊस पाडणार..."; मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं 'त्या' आमदारांना आश्वासन

Shivendraraje Bhosale statement : मंत्री शिवेंद्रराजे भोसले पंढरपुरात एक कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांना काही रस्त्यांच्या अडचणी सांगितल्या. या सर्वांच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर शिवेंद्रराजेंनी त्यांना त्यांची कामं करण्याचं आश्वासन दिलं आहे.
Shivendra Raje Bhosale
Shivendra Raje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News, 06 Apr : "यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितल्यामुळे यंदा काही करू शकलो नाही. पण, जूननंतर कामांचा पाऊस पाडतो"; असं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पंढरपूर येथे बोलताना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले पंढरपुरात एक कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांना काही रस्त्यांच्या अडचणी सांगितल्या. या सर्वांच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर शिवेंद्रराजेंनी त्यांना त्यांची कामं करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ते म्हणाले, यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितल्यामुळे यंदा काही करू शकलो नाही. मात्र, जूननंतर कामांचा पाऊस पाडतो, असं म्हणत त्यांनी आमदार समाधान अवताडे आणि अभिजीत पाटलांना त्यांची कामे मार्गी लावण्याचा शब्द दिला. त्यामुळे आता जूननंतर या आमदारांची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Shivendra Raje Bhosale
BJP office : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला; कर्मचाऱ्यावर तलवारीने वार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

तर शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कारण लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला अनेक विकासकामे थांबवावी लागत आहेत. त्यामुळे मंत्र्यांना देखील त्यांच्या खात्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचं चित्र आहे.

Shivendra Raje Bhosale
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांच्या मुलाच्या जीवाला धोका! शिवाजी महाराजांची शपथ घेत सांगितलं, 'त्या' पत्राने खळबळ

अशातच शिवेंद्रराजेंनी यावर्षी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं आहे, असं म्हटल्यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, याचवेळी शिवेंद्रराजेंनी भाजप हा सर्वांनाच मदत करतो. त्यामुळे भाजपची साथ सोडू नका, असं आवाहन देखील उपस्थित नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com