Aditya Kool : पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; सारंगखेड्यातून खरेदी केला तब्बल 11 लाखांचा घोडा

Sarangkheda Horse Bazar : सारंगखेडामध्ये भरलेल्या घोडेबाजारात नेते, उद्योजक आणि धनिकांची मोठी उपस्थिती दिसली. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या चिरंजीवाने पहिल्याच दिवशी 11 लाखांचा जातीवंत घोडा खरेदी करून लक्ष वेधले.
Aaditya Kool
Aaditya KoolSarkarnama
Published on
Updated on
  1. नंदुरबारच्या सारंगखेड्यात 350 वर्षांची परंपरा असलेला देशातील सर्वात मोठा ‘चेतक महोत्सव’ घोडेबाजार भरला असून पहिल्याच दिवशी 2500 घोडे दाखल झाले.

  2. बाजारात काटेवाड, मारवाड, नुकरा यांसारख्या जातींचे 25 हजारांपासून 10 कोटी रुपयांपर्यंतचे महागडे घोडे उपलब्ध असतात.

  3. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य कुल यांनी पहिल्याच दिवशी 21 महिन्यांचा पांढरा घोडा 11 लाखांना खरेदी केला.

Pune, 04 December : पुढारी आणि नेतेमंडळींचे अश्वप्रेम नवे नाही. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे दरवर्षी हिवाळ्यात घोडेबाजार भरतो. देशातील सर्वांत मोठा घोडेबाजार म्हणून सारंगखेड्याकडे बघितले जाते. सारंगखेड्याप्रमाणेच मोहिते पाटील यांच्या अकलूजमध्येही जातीवंत घोड्यांचा बाजार भरतो. अनेक उद्योजक, पुढारी, राजे, महाराजे घराण्यातील बड्या व्यक्तीच घोड्यांची खरेदी करत असल्याचे दिसून आले. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या चिरंजीवानेही सारंगखेडा बाजारातून पहिल्याच दिवशी तब्बल 11 लाखांचा घोडा खरेदी केला आहे.

जातीवंत घोड्यांसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या सारंगखेडा (Sarangkheda) इथला घोडेबाजार प्रसिद्ध आहे. दत्त जयंतीनिमित्त यंदा हा घोडेबाजार पुन्हा भरला असून घोडेबाजाराचे यंदाचे हे 350 वे वर्ष आहे. दरवर्षी या बाजारत खरेदीचे उच्चांक पहायला मिळतात. पहिल्याच दिवशी सारंगखेड्याच्या बाजारात जवळपास 2500 घोडे दाखल झाले आहेत.

सारंगखेडा येथील घोडेबाजार (Horse Bazar) देशभरात प्रसिद्ध आहे. या घोडेबाजाराला ‘चेतक महोत्सव’ असेही म्हटले जाते. या बाजारात काटेवाड, मारवाड, नुकरा अशा विविध जातींचे घोडे खरेदी विक्रीसाठी येत असतात. बाजारात 25 हजारांपासून 10 कोटी रुपयांपर्यंत घोडे विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे सारंगखेडा येथील घोडेबाजाराचे विशेष आकर्षण असते.

सारंगखेडा येथील घोडेबाजाराच्या पहिल्या दिवशी खरेदी विक्रीने उच्चांक गाठला आहे. दहा कोटी रुपयांपर्यंत किमत असलेले महागडे घोडेही या बाजारात दाखल झाले आहेत, त्यामुळे या बाजाराकडे सर्वांत महागडा घोडेबाजार म्हणून पाहिले जाते.

Aaditya Kool
Babasaheb Patil : सहकार मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी? शेतकरी कर्जमाफीवर बोलूच नका; पाटलांची जाहीर कबुली

या घोडेबाजारात पहिल्याच दिवशी दौंडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य कुल यांनी 11 लाख रुपयांचा घोडा खरेदी केला आहे. आदित्य यांनी पांढऱ्या रंगाचा 21 महिन्यांचा घोडा खरेदी केला आहे. घोडा खरेदीसाठी आदित्य कुल हे गेल्या दोन दिवसांपासून या बाजारात तळ ठोकून होते.

याबाबत आदित्य कुल म्हणाले, घोडा खरेदी करण्यासाठी मी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या राहू येथून आलो आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात मी घोडे पाहत होता. मला पांढऱ्या रंगाचा २१ महिन्यांचा घोडा मला आवडला. दिसायला वैगेरे सुंदर आहे, त्यामुळे मी तो खरेदी केला आहे.

Aaditya Kool
MLC Controversy : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय; न्यायमूर्ती म्हणाले ‘राज्यासाठी अत्यंत महत्वाचा....’
  1. सारंगखेडा घोडेबाजार कशासाठी प्रसिद्ध आहे?
    तो 350 वर्षांची परंपरा असलेला देशातील सर्वात मोठा जातीवंत घोडेबाजार आहे.

  2. या बाजारात कोणते जातींचे घोडे येतात?
    काटेवाड, मारवाड, नुकरा अशा विविध जातींचे घोडे विक्रीसाठी येतात.

  3. घोड्यांच्या किमती किती असतात?
    घोड्यांच्या किमती 25 हजारांपासून 10 कोटी रुपयांपर्यंत असतात.

  4. आदित्य कुल यांनी किती किमतीचा घोडा घेतला?
    त्यांनी 11 लाख रुपयांचा 21 महिन्यांचा पांढरा घोडा खरेदी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com