मुख्यमंत्र्यांनी वीर-भाटघरच्या धरणात येऊन बघावे, शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे दिसेल!

भाजप आमदार राम सातपुते यांची शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
Uddhav Thackeray-Ram Satpute
Uddhav Thackeray-Ram Satputesarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) सोलापूर जिल्ह्यातील जनतेने नगरपंचायत निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. राष्ट्रवादीने या पुढे निवडणुका लढवताना चिंतन करावे, असा सल्ला देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि शिवसेनेने (shivsena) स्वतःला आरशात बघितले पाहिजे. जर त्यांना आरशात बघ्याचे नसेल तर त्यांनी वीर, भाटघरच्या धरणात येवून पाहावे. त्यामध्ये स्पष्ट दिसेल की शिवसेनेला उतरती कळा लागली आहे, असा उपरोधिक टोला माळशिरसचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला लगावला. (BJP MLA Ram Satpute criticizes Shiv Sena-NCP)

माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते, महाळुंग-श्रीपूर या तीनही नगरपंचायतींवर भाजप व मोहिते पाटील आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार सातपुते यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस व शिवसेनेवर हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray-Ram Satpute
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत; आव्हाड म्हणतात, ‘मला हे मान्य नाही’!

या वेळी आमदार सातपुते म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी, काॅंग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांनी जनतेचा विश्वासघात करून अनैसर्गिक युती करुन सत्ता मिळवली आहे. त्यामुळे जनतेचा मनात आजही रोष आहे. तोच या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला आहे. जनतेच्या पाठबळावरच नगरपंचयातीच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीला जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. यामध्ये शिवसेनेला चांगलीच उतरती कळा लागली आहे.

Uddhav Thackeray-Ram Satpute
माळशिरसमधला विजय कुणा व्यक्तीचा नव्हे : भाजप पदाधिकाऱ्याचा मोहितेंना टोमणा

माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेने महाविकास आघाडीला या निवडणुकीतून चांगलाच धडा शिकवला आहे. अशी टीकाही आमदार सातपुते यांनी केली. या वेळी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरसचे भाजप नेते आप्पासाहेब देशमुख, नातेपुतेचे बाबाराजे देशमुख आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com