Ram Satpute's mother Passed Away : भाजप आमदार राम सातपुते यांना मातृशोक; जिजाबाई सातपुते यांचं निधन!

Ram Satpute's mother Passed Away : काहीच दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ आहे म्हणून राम सातपुते यांच्या मातोश्री जिजाबाई यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
MLA Ram Satpute's mother Passed Away : Jijabai Satpute
MLA Ram Satpute's mother Passed Away : Jijabai SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur Malshiras News : भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे आज निधन झाले. मांडवे गाव तालुका माळशिरस येथे राहत्या घरी जिजाबाई सातपुते यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सातपुते यांना झालेल्या मातृशोकामुळे सातपुते कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवार (ता. २६) रोजी सायंकाळी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या मातोश्री होत्या.

MLA Ram Satpute's mother Passed Away : Jijabai Satpute
Eknath Shinde On Hoardings : नेत्यांच्या चमकोगिरीवर मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी; म्हणाले, 'वारकऱ्यांच्या स्वागताचे..'

काहीच दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ आहे म्हणून राम सातपुते यांच्या मातोश्री जिजाबाई यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी काही तपासणी केल्यानंतर त्यांनी काही औषधे डॉक्टरांनी सुचविले होते. परंतु काल सायंकाळी त्यांचे निधन झाले. जिजाबाई सातपुते यांच्यावर डोईठाण (ता. आष्टी, जि. बीड) येथे आज मंगळवार (ता. २७) सकाळी ०९.०० वाजता अंतिम संस्कार करण्यात आले.

MLA Ram Satpute's mother Passed Away : Jijabai Satpute
Prakash Ambedkar Big Statement : ''...त्यामुळे महाराष्ट्रातील दंगली थांबल्या !''; आंबेडकरांचं खळबळजनक विधान

अत्यंत देवभक्त विशेषतः पांडुरंगावर अत्यंत निष्ठा होती. एकदम पापभिरू, शांत असा त्यांचा स्वभाव होता. आमदार राम सातपुते सामाजिक कामे विशेषतः आरोग्याची कामे करतात, त्यामागे मातोश्री जिजाबाई यांचीच प्रेरणा होती. (Ram Satpute's mother Passed Away)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com