BJP Election Strategy : भाजप इलेक्शन मोडवर; अवघ्या आठ दिवसांत पाच मंत्री सोलापूर दौऱ्यावर!

Solapur BJP News : नव्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पदभार हाती घेत कामाला सुरुवात केली आहे. त्यांना चार्ज करण्यासाठी सरकारमधील भाजपचे मंत्री आणि वरिष्ठ नेते वेगवेगळ्या शहरात दौरे करत आहेत.
BJP Minister
BJP MinisterSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 June : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातही सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवरील हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इनकमिंगवर भर देण्यात येत असून भाजपकडून मात्र संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच अवघ्या आठ दिवसांत तब्बल पाच मंत्र्यांनी सोलापूरचा दौरा केला असून कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला आहे, त्यामुळे भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विशेषतः पाचही वर्षे इलेक्शन मोडवर असलेल्या भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीचे मायक्रो प्लॅनिंग सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपने तातडीने जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची नियुक्त्या केल्या.

नव्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पदभार हाती घेत कामाला सुरुवात केली आहे. त्यांना चार्ज करण्यासाठी सरकारमधील भाजपचे (BJP) मंत्री आणि वरिष्ठ नेते वेगवेगळ्या शहरात दौरे करत आहेत. त्याच्या जोडीला मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटना मदतीला आहेत. मुळात मंत्र्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत भाजपचे सर्व लोक निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

गेल्या आठ दिवसांत सोलापुरात भाजपच्या तब्बल पाच मंत्र्यांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या परीने पक्षासाठी वेळ दिला आहे. प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २९ मे रोजी सोलापूरचा दौरा केला आहे. सकाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी दुपारनंतर पक्ष कार्यकर्त्यांसाठी वेळ दिला. कार्यकर्त्यांच्या कामांची निवेदन स्वीकारून त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याची सूचना केली. विशेष म्हणजे वरिष्ठ आमदारांचा रुसवा दूर करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला.

BJP Minister
Sangli Politic's : 3 माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांनी धुडकावला जयंतरावांचा निरोप; राष्ट्रवादीतील प्रवेश रोखण्याचा डाव फसला

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांनी वेळ दिला होता. चंद्रकांतदादांच्या दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरेही सोबत होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यानंतर गुरुवारी (ता. ०५ जून) कॅबिनेट मंत्री नीतेश राणे हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूरमध्ये बाबा कादरी मस्जिद आणि पंजाब तालीमजवळ झालेल्या घटनेतील जखमी झालेल्या हिंदूंची राणे यांनी भेट घेतली. त्यांना धीर देत एक प्रकारचे भाजप हिंदुत्वाचा अजेंडा मंत्री राणेंच्या माध्यमातून राबविला जात असल्याचे स्पष्ट आहे.

BJP Minister
Solapur Politic's : ‘मी नावालाच तुतारीवाला’ म्हणणाऱ्या पवारांच्या आमदाराचा जीव अडकलाय शिवसेनेत...केवळ आमदार होण्यासाठीच तुतारी फुंकली!

मंगलप्रभात लोढा हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. शहरातील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधत एक प्रकारे महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन शहरातील कार्यकर्त्यांना केले आहे, त्यामुळे भाजप इलेक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com