Mohite Patil : मोहिते पाटलांचा कल्याणशेट्टींवर पलटवार : विधान परिषदेची त्यांनी अर्धीच गोष्ट सांगितली; सामंतांचा फोन...मुख्यमंत्र्यांचा निरोप; पण माझं सर्वांना एकच उत्तर...

BJP MLA Sachin Kalyanshetti News : विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेबाबत सचिन कल्याणशेट्टी अर्धसत्य सांगत असल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. शरद पवारांच्या सूचनेनंतरच अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Sachin Kalyanshetti-Dhairyasheel Mohite Patil
Sachin Kalyanshetti-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 30 October : भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींनी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची अर्धीच गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगितली. ते अजिबात खोटं बोलत नाही, त्यांचा मला फोन आला होता. त्याशिवाय उद्योग मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून उमेदवार मागे घेण्याबाबत निरोप आला होता. पण, मी सर्वांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलण्याची विनंती केली होती. त्यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्या क्षणाला मी अर्ज मागे घेतो, असे सांगितले होते, त्यामुळे कल्याणशेट्टी अर्ध सत्य सांगत आहेत, असा शब्दांत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टींवर पलटवार केला.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार मोहिते पाटील यांनी सचिन कल्याणशेट्टी यांना संपूर्ण सत्य सांगण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमचीही भूमिका आहे. त्या पद्धतीने सर्व काही सुरू आहे. सहकारी क्षेत्रात ज्यांनी काम केले आहे, सध्या करत आहेत, अशा जानकार व्यक्तींसोबत आमची चर्चा सुरू आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी अर्ज माघारी घेण्यास अवघे ४० ते ४५ मिनिटे राहिलेले असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मला कॉल केला होता. तुम्ही तुमचा उमेदवार मागे घ्या, असे त्यांनी मला सांगितले होते. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं, ‘अगोदर बैठका व्हायला पाहिजे होत्या. मी काही अपक्ष निवडून आलेले नव्हतो. तसेच, आमचा उमेदवारही अपक्ष नव्हता. तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत होता,’ असे मोहिते पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले, सचिन कल्याणशेट्टी अजिबात खोट बोलत नाहीत. त्या वेळी ते माझ्याशी बोलले होते. उद्योग मंत्री उदय सामंत हेही माझ्याशी बोलले. रणजितसिंह मोहिते पाटील यांचाही मला फोन आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना निरोप आला हेाता. माझं फडणवीस यांच्यासोबत थेट बोलणं झालं नव्हतं. मंत्री सामंत यांनीही मुख्यमंत्र्यांचा निरोप असल्याचे सांगून फोन केला होता.

Sachin Kalyanshetti-Dhairyasheel Mohite Patil
Karad Politic's : ॲड. उदयसिंह उंडाळकरांच्या मेळाव्याला कट्टर विरोधकाची हजेरी; अनेक वर्षांच्या राजकीय शत्रुत्वाला पूर्णविराम

त्यावेळी मी सर्वांना एकच उत्तर दिले होते, ज्यांनी या देशाचे नेतृत्व केले, ते आदरणीय शरद पवार हे माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तुम्ही पवारसाहेबांशी एकदा बोला. त्यांनी सांगितलं की, मी दुसऱ्या क्षणाला अर्ज काढतो आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करतो. त्या वेळी कल्याणशेट्टी यांनाही सांगितलं होतं की, तुम्ही शरद पवार यांच्याशी बोला. मी दुसऱ्या क्षणाला अर्ज काढतो, असेही धैर्यशील यांनी नमूद केले.

ते म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलायचं झाल्यास जे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत, ज्यांनी पूर्वी सहकार क्षेत्रात काम केले आहे (जिल्हा दूध संघो अथवा डीसीसी बॅंक असो), त्या सर्व ज्येष्ठ नेत्यांशी आमचं बोलणं सुरू आहे. एकमेकांशी संवाद सुरू आहे. त्या दृष्टीकोनातून आम्ही सर्वजण पुढे जात आहोत.

सचिन कल्याणशेट्टी यांनी कागदपत्रांसहित भूमिका मांडण्याचे दिलेले आव्हान मोहिते पाटील यांनी उडवत लावत ‘मी फक्त तुम्हाला टीझर दाखवला आहे. आणखी पुढे ट्रेलर आणि पिक्चर यायचाय. हळूहळू सगळं पुढे बघत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sachin Kalyanshetti-Dhairyasheel Mohite Patil
Satara Politic's : साताऱ्यात शिवेंद्रराजेंच्या पुढाकाराने कट्टर विरोधक एकत्र : रामराजे-जयकुमार गोरेंमध्ये जाहीर व्यासपीठावर दिलखुलास गप्पा

देशमुख, शिवसेना नेत्यांशी मोहिते पाटलांची चर्चा?

आमदार सुभाष देशमुख आणि शिवसेना नेत्यांशी मोहिते पाटील यांची चर्चा सुरू असून त्या माध्यमातून जिल्हा बॅंक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे, या प्रश्नावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, छाननी होऊ द्या. उमेदवारी अर्ज माघारीस आणखी १५ दिवस आहेत. काय काय होतंय, हे तुम्ही शोधत राहावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

sachin kalyanshetti-ranjitsinh mohite patil
Ranjitsinh Mohite Patil-Prashant Paricharak
Dhairyasheel Mohite Patil-Jaykumar Gore
Ranjitsinh Mohite Patil-Sachin kalyanshetti