BJP Politics: CM फडणवीसांचं कौतुक करून साखरपेरणी! शरद पवारांचा बडा नेता पुन्हा भाजपच्या वाटेवर?

BJP Politics: मुख्यमंत्री फडणवीस यांची या नेत्यानं भेटही घेतली आहे, त्यामुळं येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
amit shah devendra fadnavis narendra modi
amit shah devendra fadnavis narendra modisarkarnama
Published on
Updated on

BJP Politics: केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारनं सहकार खात्यामध्ये केलेल्या बदलांचे दाखले देऊन यासाठी त्यांचं कोडकौतुक करुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला एक नेता पुन्हा भाजपच्या वाटेवर चालला असल्याचं चित्र आहे. तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांची या नेत्यानं भेटही घेतली आहे. त्यामुळं येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

amit shah devendra fadnavis narendra modi
Ladki Bahin Yojna: राज्यात 288 शहरांत आचारसंहिता लागू; लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का?

पश्चिम महाराष्ट्रातला हा नेता म्हणजे हर्षवर्धन पाटील आहेत. एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी नुकतचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळं ते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अर्थात यापूर्वीच अनेकदा त्यांच्या भाजपत जाण्याच्या चर्चा सुरु होत्या. पण अद्याप त्यांनी अधिकृतरित्या असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण सातत्यानं त्यांच्याकडून भाजपच्या नेत्यांचं कौतुक सुरु आहे.

amit shah devendra fadnavis narendra modi
Maharashtra Elections 2025: अखेर प्रतिक्षा संपली! नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा; असं आहे टाईम-टेबल

हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले?

आवर्जुन उल्लेख केला पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री. राजकीय विषय सोडून द्या पण यांनी या साखर उद्योगाकरता निश्चितपणानं काही धोरणं स्विकारली. यामध्ये इथॅनॉलचं धोरण असेल इन्कम टॅक्स माफीचं धोरण असेल, एक्स्पोर्टची पॉलिसी असेल किंवा आंतरराष्ट्रीय टीम आणून २ लाख कोटी रुपयांची कर्जे ६ टक्के व्याजानं उभारून केल्याचं काम असेल. बघता बघता हा साखर उद्योग आता बायोसीएनजीच्या माध्यमातून पुढे येणार आहे. ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून हा उद्योग पुढे येणार आहे. येणाऱ्या भविष्यकाळात जगाला इथेनॉल आणि साखर पुरवण्याचं काम आपल्याकडं होत आहे.

amit shah devendra fadnavis narendra modi
Gulabrao Patil Politics: पालकमंत्री गुलाबराव पाटील संतापले, एकनाथ खडसेंना धारेवर धरले, इतिहासच काढला

कारण जी माणसं काम करत आहेत त्यांना मदत केली पाहिजे, यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, सहकार मंत्र्यांनाही भेटलो जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनाही भेटलो. त्यांना सांगितलं की आमचा कारखाना अडचणीत आला आहे. आमचं आर्थिक संकट मोठं आहे, आमचं क्रशिंग कमी झालं आहे, सहकारातले आम्हाला नियम आहेत. आम्ही वेड्यावाकड्या गोष्टी करणार नाही. तसं आमचं ट्रॅक रेकॉर्डही नाही. त्यानुसार गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीच आम्हाला १५० कोटी रुपयांची मदत केली, अशा शब्दांत हर्षवर्धन पाटील यांनी सहकारावर भाष्य करताना भाजप नेत्यांचं कौतुक केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com