Ahmednagar BJP City President: भाजपने बदलले तीनही जिल्हाध्यक्ष; आगरकर, भालसिंग, लंघे यांची वर्णी!

Ahmednagar BJP Appointed New City President: "शहरातील नागरिक शांतताप्रिय असून गुंडगिरीला कंटाळली आहे."
Abhay Agarkar - dilip Bhal Singh - vitthal Langhe
Abhay Agarkar - dilip Bhal Singh - vitthal LangheSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : प्रदेश भाजपने अहमदनगर जिल्ह्यातील विद्यमान तीनही जिल्हाध्यक्षांना डच्चू देऊन, नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मूळ जुन्या भाजपशी एकनिष्ठ असे हे चेहरे असून संभाव्य महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्या निवडणुकांत पक्षाला उभारी आणत जिल्हा भाजपमय करण्याच्या अनुषंगाने हे टाकलेले पाऊल मानले जात आहे.

अहमदनगर शहर जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, दक्षिण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून दिलीप भालसिंग, तर उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून विठ्ठल लंघे यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Abhay Agarkar - dilip Bhal Singh - vitthal Langhe
Praful Patel News : दिल्लीतील बैठकीनंतर प्रफुल पटेल म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस आता NDA चा अविभाज्य घटक.."

अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र गंधे यांच्या जागी आता माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगरकर हे पक्षाचे जुने आणि संघाशी निगडित असलेले शांत-संयमी नेते म्हणून परिचित आहे. 2014 आली भाजपकडून त्यांनी नगर शहरातून उमेदवारी मिळवली होती, मात्र त्यांचा शिवसेना-भाजप मतविभागणी होऊन निसटता पराभव झाला. शहरातील लक्षणीय ओबीसी मतदान असल्याने पक्षाने शहरात ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

नगर उत्तर जिल्हाध्यक्ष पदी राजेंद्र गोंदकर यांच्या जागी नेवासा तालुक्यातील विठ्ठल लंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. दक्षिणेतून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे पण इच्छुक होते. मात्र पक्ष नेतृत्वाने दक्षिणेतील विखे, गडाख असे राजकीय गणितं लक्षात घेऊन, लंघे यांची निवड केल्याचे बोलले जाते.

Abhay Agarkar - dilip Bhal Singh - vitthal Langhe
Vasudev Kale : अजितदादांसारख्या बड्या नेत्यापुढे भाजपला मजबूत करणं वासुदेव काळे यांच्यापुढे आव्हान..

नगर दक्षिणेत शेवगावचे अरुण मुंडे यांच्या जागेवर, नगर तालुक्यातील भाजपचे जुने आणि मूळ कार्यकर्ते राहिलेले दिलीप भालसिंग यांची वर्णी प्रदेश भाजपने लावली आहे. भालसिंग हे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे जवळचे मानले जातात. मागील काही महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली, मुलाखती सुरू होत्या. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डी, नगरमध्ये बैठका घेत पक्षाची झाडाझडती घेतली होती.

विद्यमान तीनही पदाधिकाऱ्यांना बदलताना त्यांना नव्याने संघटनेत प्रदेश पातळीवर सामावून घेण्यात आले आहे. अरुण मुंडे यांना प्रदेश चिटणीस, राजेंद्र गोंदकर यांना प्रदेश कार्यकारिणीत घेताना महेंद्र गंधे यांना नगर शहर विधानसभा प्रमुख समन्वयक करण्यात आले आहे. विधानसभेसाठी भाजपकडून गंधे इच्छुक असल्याचे बोलले जाते.

Abhay Agarkar - dilip Bhal Singh - vitthal Langhe
BJP District President News: ठाकूर सक्रिय झाल्याने चालुक्य यांची जिल्हाध्यक्षपदी निवड..

शहर जिल्ह्याध्यक्षपदी नियुक्ती झालेले आगरकर यांनी निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महापौर होण्यासाठी पक्षविस्ताराच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगत पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करू असे सांगितले. शहरातील नागरिक शांतताप्रिय असून गुंडगिरीला कंटाळली आहे, त्या दृष्टीने पक्षाकडे निदर्शनास आणू, असे सूचक वक्तव्य आगरकर यांनी सरकारनामाशी बोलताना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com