BJP Politic's : भाजपचे 7 पंचायत समितीत सत्ता स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे; 'या' नेत्यांवर गटनेत्याची जबाबदारी!

Solapur Panchayat Samiti Sabhapati Election : सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती निवडणुकीपूर्वी गटनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून भाजपने सात समित्यांमध्ये पुढाकार घेत सदस्यांना कायदेशीररित्या बांधून ठेवण्याची रणनीती आखली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 March : सोलापूर जिल्ह्यातील 11पंचायत समित्यांच्या सदस्यांची गटनोंदणी करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. अकरापैकी सात पंचायत समितीमध्ये भाजपने, तर एका पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गटनोंदणी केली आहे. पंचायत समितीचे सभापती व उपसभापतींच्या निवडी 12 मार्च रोजी होत आहेत. त्यापूर्वी गटनोंदणी करून आपल्या सदस्यांना कायदेशीररित्या बांधून घेतले जात आहे. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता अधिनियम 1986 आणि त्या खालील महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनहर्ता 1987 नूसार ही नोंदणी करण्यात आली आहे.

भाजपचे (BJP) पंढरपूरमध्ये ८, माळशिरसमध्ये ६, दक्षिण सोलापूरमध्ये ११, बार्शीमध्ये १२, मोहोळमध्ये ७, करमाळ्यात ७ आणि अक्कलकोटमध्ये ८ पंचायत समिती सदस्य विजयी झाले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी गटनोंदणीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार ही नोंदणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावानूसार करमाळा तालुका पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या गटनोंदणीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार या गटांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत करमाळा तालुक्यात आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीला, सांगोल्यात आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या सांगोला तालुका विकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे.

पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचेही सदस्य विजयी झाले आहेत. या तिन्ही तालुक्यातील स्थानिक आघाड्यांनी मात्र गटनोंदणीबाबत अद्याप कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही, त्यामुळे आघाडीच्या बहुतांश प्रमुख नेत्यांनी सत्तेसोबत राहण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

भाजपने तालुकानिहाय निवडलेले गटनेते

पंढरपूर : निखील गोसावी

माळशिरस : दतात्रय शेळके

दक्षिण सोलापूर : बलवान गोतसुर्वे

बार्शी : भीमा गव्हाणे

अक्कलकोट : सागर कल्याणशेट्टी

करमाळा : सोनाली तकीक

मोहोळ : संजीव खिलारे

राष्ट्रवादी काँग्रेस :

करमाळा : दशरथ घाडगे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com